निवेदनात म्हटले आहे की, साक्री शहरातील प्रत्येक कॉलनी परिसरात शाळा तसेच अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाडी केंद्रात साक्री शहरातील नागरिकांना लसीकरण करणे सोयीचे होईल. साक्री ग्रामीण रुग्णालयात सध्या लसीकरण केंद्र सुरू आहे.मात्र त्या ठिकाणी दररोज प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोना पसरण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. अनेक जण या गर्दीमुळे लसीकरणासाठी घराबाहेर पडत नाही. त्यामुळे ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने शहरात व प्रत्येक गावात लसीकरण केंद्र वाढविण्यास मंजुरी द्यावी, अशा मागणीचे निवेदन साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके व साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भाजप धुळे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष हेमंत पवार, सुशील भंडारी, संदीप माळी, कार्तिक रामोळे व साक्री शहर कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST