धुळे : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही एक्स्प्रेस सुरू केलेल्या आहेत. मात्र धुळे-चाळीसगाव मार्गावर एकही एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर सुरू नाही. तर पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर काही एक्स्प्रेस सुरू असून, अद्याप एकही पॅसेंजर सुरू नसल्याने, गरीब प्रवाशांची परवड होत आहे.धुळे-चाळीसगाव मार्गावर एक्स्प्रेस नाही. येथून फक्त ४० गावपर्यंत पॅसेंजर आहे. ती देखील २३ मार्चपासुन बंद आहे.पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ मार्गावर लाॉकडाऊन होण्यापूर्वी १७ एक्स्प्रेस व तीन पॅसेंजर धावत होत्या. मात्र रेल्वे मंत्रालयाने या मार्गावर काही एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या. परंतु सुरत मार्गावर जिल्ह्यातील दोनच मोठे स्थानक आहेत.ज्या एक्स्प्रेस गाड्या धावतात त्यापैकी फक्त ताप्ती गंगा व अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसलाच शिंदखेडा, दोंडाईचा या स्थानकावर थांबा आहे. सुरत-भुसावळ पॅसेंजर सुरू न झाल्याने गरीब प्रवाशांना जादा पैसे देवून बसचा प्रवास करावा लागतोय.
पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची होतेय गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 11:45 IST