शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

धुळे जिल्ह्यातील पशुपालकांना मिळणार प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 15:51 IST

पशुसंवर्धन विभाग : योजना राबविण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार

ठळक मुद्देपशुपालक उन्नती योजनेंतर्गत मिल्किंग मशीन, खवा मशीन व पॅकिंग मशीनसाठी ८० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखलाभार्थी निवडीसाठी पशुपालक हा ग्रामीण भागातील असणे गरजेचे आहे. पशुपालकांकडे किमान ५ ते १० संकरीत गायी किंवा म्हशी असणे आवश्यक आहे. ४८० टक्के अनुदान लाभार्थींना मिळणार असले, तरी लाभार्थींना २० टक्के हिस्सा द्यावा लागणार आहे. लाभार्थींना मिळणारे मशीन किमा त्यानुसार लाभार्थींची निवड करताना समितीमार्फत गुणांकन ठरवून लाभार्थी निश्चित केले जातील, अशीमाहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  :   जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक उन्नती योजना, पशुसंजीवनी अ‍ॅप व आदर्श पशुपालक पुरस्कार अशा नावीन्यूपर्ण योजना राबविण्यात येत  आहेत. या योजना राबविण्यासाठी पुणेस्थीत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची मंजुरी आवश्यक असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदस्तरावर प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व विशेष सर्वसाधारण सभेत या योजनांना मंजुरी मिळाली आहे. या योजनांना मंजुरीसाठी प्रस्ताव  तयार करण्याचे  काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष या योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनांमुळे जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळणार असून दुग्धोत्पादनातही वाढ होणार आहे. सन २०१७-२०१८ याकालावधीसाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुपालक उन्नती योजनेंतर्गत मिल्किंग मशीन वाटप, खवा मशीन व पॅकिंग मशीन पुरवठा केले जाणार आहे. त्यासोबत पशुपालकांची गैरसोय होऊ नये; म्हणून पशुसंजीवनी अ‍ॅपदेखील तयार केले जाणार आहे. तसेच आदर्श पशुपालक पुरस्काराचे वितरण यावर्षी केले जाणार आहे.  या तिन्ही योजनांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही मंजुरी मिळाली आहे. परंतु, या योजना राबविण्यासाठी  पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाची मंजुरीही आवश्यक असल्याने आता जिल्हा परिषदस्तरावर प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांनी दिली. पशुसंजीवनी अ‍ॅपमुळे पशुपालकांची गैरसोय टळणार पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’ तयार केले जाणार आहे. या अ‍ॅपमुळे पशुपालकांची गैरसोय टळणार आहे. या अ‍ॅपमुळे पशुपालकांना जिल्ह्यात असलेली पशुवैद्यकीय दवाखाने, गावनिहाय पशुधनाची संख्या, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना लसीकरणाचे वेळापत्रक, तज्ज्ञांचा मार्गदर्शक सल्ला, पशुसंवर्धन विभागच्या सेवा व सुविधा, पशुसंवर्धन विभागाचे कार्यमोहीम वेळापत्रक, प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबी एका क्लिकवर कळणार आहे. या अ‍ॅप्सची रचना कशी असली पाहिजे. त्यात नेमके काय फिचर्स असतील, याचा प्राथमिक अहवाल पशुसंवर्धन विभागाने तयार केला आहे. 

आदर्श पशुपालक पुरस्कार होणार सुरुशेतीला पुरक व्यवसाय म्हणून पशु पालनावर भर दिला जातो. शेतकºयांना पशुधन संगोपनासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने  आदर्श पशुपालक पुरस्कार योजनाही यंदापासून सुरू करण्यात येणार आहे. आदर्श पशुपालन करणाºया शेतकºयांची निवड करुन त्यांचा गौरव केला जाणार आहे. ही निवडही जि.प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीमार्फत केली जाणार  आहे.

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद