महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच उत्तमराव पाटील महाविद्यालय, दहीवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचार्य आणि करिअर कट्टा समन्वयक यांच्या ऑनलाइन सहविचार सभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी उच्चशिक्षण विभाग, जळगावचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे होते. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील (शहादा), प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे (साक्री), प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार (निजामपूर), प्राचार्य वाय. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. संजयकुमार बारी (जळगाव), धुळे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन नांद्रे आदी उपस्थित होते.
नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य संधी निर्माण होण्यासाठी करिअर कट्ट्याचे काम महत्त्वाचे असल्याचे मत प्र-कुलगुरु डॉ.बी.व्ही. पवार यांनी व्यक्त केले.
सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण म्हणाले की, शिक्षणाला कौशल्याची व मार्गदर्शनाची जोड मिळाल्यास नोकरी आणि उद्योग या क्षेत्रातून अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी जीवन साध्य करणे शक्य होईल.
यशवंत शितोळे यांनी प्रशासनात तसेच व्यवसायात समाजातील तरुण विद्यार्थ्यांचा टक्का वाढवायचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना ज्ञान व मार्गदर्शन देण्यासाठी करिअर कट्ट्याची स्थापना झाली असल्याचे नमूद केले.
प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून प्राप्त संधीचे सोने करून शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य याच्यात वाढ करावी असा सल्ला दिला. प्राचार्य डॉ. ए. पी. खैरनार यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशासनात तसेच व्यवसायात नव संधी निर्माण करण्यासाठी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे नमूद केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुरेश अहिरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात येणाऱ्या आव्हानांचे निर्मूलन होण्यासाठी करिअर गटाच्या माध्यमातून भरीव कार्य होताना दिसत असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक करिअर कट्टा धुळे जिल्हा समन्वयक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. संचलन नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. किरण मराठे, तर आभार जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. विजय तुंटे यांनी मानले.
250821\img-20210824-wa0056.jpg
महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमात प्र. कुलगुरू, उच्च शिक्षण सह संचालक जळगाव, शासन प्रतिनिधी, प्राचार्य, विद्यार्थी सहभागी.