शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

रोगप्रतिकारक शक्ती करेल कोरोनाचा प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:03 IST

तज्ज्ञांचे मत : धन्वंतरी मेडीकल फाऊंडेशन, अग्रवाल समाजातर्फे जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती चांगली आहे अशांना कोरोनाचा फारसा त्रास होत नाही, म्हणून प्रतिकार शक्ती वाढवावी असे मत, धन्वंतरी मेडीकल फाऊंडेशन व अग्रवाल समाजाच्या संयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कोरोना जनजाग्रुती अभियानात मान्यवरांनी व्यक्त केले. धुळयातील अग्रवाल विश्राम भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत डॉ़ मंदार म्हसकर, डॉ़ जगदिश गिंदोडिया, डॉ़ संगिता गिदोडीया यांनी कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे, सावधगिरी, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, दिनेश गिंदोडिया, निरंजन भतवाल, महेश घुगे, माजी अधिक्षक आभियंता हिरालाल ओसवाल यांची प्रमुख ऊपस्थिती होती.कोरोना संदर्भात माहिती देतांना, डॉ. मंदार म्हसकर म्हणाले, विविध माध्यमातून कोरोनाविषयी निर्माण झालेले चित्र भयावह आहे. केवळ भीतीने गर्भगळित होऊन चुकीचे मार्ग अवलंबन्याऐवजी शास्त्रीय माहितीच्या आधारे सतर्क राहून प्रतिबंध केला पाहिजे. प्रभावी औषधांच्या अभावामुळे प्रतिबंध हाच खरा उपाय आहे़ प्रतिबंधात्मक ऊपाय योजनांची डॉ़ म्हसकर यांनी सविस्तर माहिती दिली़आयुर्वेद ही भारताला मिळालेली मोठी देणगी आहे. आयुवेदात सांगितलेल्या दिनचर्यचे पालन केल्यास रोगप्रतिकारशक्ती आपोआप वाढते व कोरोना सारख्या विषाणूंचा प्रतिबंध करता येतो, असे प्रतिपादन धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशनच्या सचिव डॉ.संगिता गिंदोडिया यांनी केले.धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष, त्वचा रोग तज्ज्ञ तथा योग शिक्षक डॉ़ जगदिश गिंदोडीया यांनी निरोगी राहण्यासाठी योग, हास्य योग, प्राणायामाचे महत्व विषद केले. पुर्ण दिवसातला काही वेळ नियमित योग व प्राणायाम करणे, सकस आहार, शारीरिक स्वच्छता इत्यादींचे पालन केले तर कोरोनाच काय, कुठल्याही व्याधीचा आपण प्रतिकार करू शकतो, असे डॉ. गिंदोडिया म्हणाले. यावेळी संजय गिंदोडिया यांनी आपले घर व परिसर शुध्द रहाण्यासाठी, आपल्या परिसरातील आॅक्सीजनचे प्रमाण वाढविण्यासाठी अग्निहोत्रचा विधी व महत्व विशद केले. महेश घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेला धुळेकर नागरिकांची अभूतपूर्व ऊपस्थिती लाभली.रोगप्रतिकारक औषधे मोफतप्रतिबंधात्मक ऊपाय म्हणून केंद्रिय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले होमीओपॅथीचे औषधे वितरीत करण्यात आली़ हे औषध गिंडोदिया हॉस्पिटल दत्त मंदिर देवपूर धुळे येथे रोज दुपारी दोन ते पाच या वेळेत मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे़

टॅग्स :Dhuleधुळे