धुळे : वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर धुळे शहर तहसिल कार्यालयाने ३ जुलैला पकडले आहेत़ त्यापैकी एका ट्रॅक्टर मालकाकडून १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे तर अन्य एका ट्रॅक्टर मालकाकडून तितकाच दंड वसुल करण्याची कार्यवाही सुरू आहे़ १० जुलै रोजी आणखी एक ट्रॅक्टर गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना आढळून आले़ परंतु त्यांनी पळ काढला़ याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अपर तहसिलदार संजय शिंदे यांनी दिली़
अवैध वाळू वाहतूक दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 22:11 IST