शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विश्वास नसल्यास शासकीय यंत्रणेद्वारे परीक्षा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 12:13 IST

धुळे जिल्हा समन्वय समिती : जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला निर्णय

ठळक मुद्देजिल्ह्यातील केंद्रावर कॉपी प्रकारामुळे सीईओ संतप्तकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा दिला होता इशाराकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा दिला होता इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बारावीच्या परीक्षेत कॉपी प्रकरणी केंद्र संचालक पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान परीक्षा यंत्रणेबाबत केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर अविश्वास असल्यास, शासकीय यंत्रणेद्वारे परीक्षा घ्यावी अशी मागणी धुळे जिल्हा समन्वय समितीने बैठकीनंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.बारावीच्या परीक्षेत सर्वच केंद्रावर कॉपीचे प्रकार सर्रास सुरू असल्याने, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी शुक्रवारी सायंकाळी केंद्र संचालक, विस्तार अधिकारी यांची कानउघडणी केली होती. सीईओंच्या भूमिकेनंतर जिल्हा समन्वय समितीने  बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली.  यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉपीचे समर्थन कोणीही करत नाही. कॉपीमुक्त अभियान राबविण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करित आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेच्यावेळी केंद्र संचालक, बैठे पथक, दक्षता समिती सदस्य, पोलीस पर्यवेक्षक व इतर कर्मचारी कार्यरत असतात. अशावेळी कॉपी प्रकरणी केवळ केंद्र संचालक, पर्यवेक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरच कारवाई करणे योग्य नाही. परीक्षा केंद्रावर काम करणारे दबावातच काम करतात. गेल्या २१ तारखेपासून परीक्षेच्या कालावधीत काही केंद्र संचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल व निलंबन करण्यासंदर्भात नोटीसा बजवण्यात आलेल्या आहेत. त्या मागे घेण्यात याव्यात.परीक्षा कालावधीत कर्मचाºयांना संरक्षण दिले जात नाही. त्यांच्यावर होणाºया हल्याची दखल घेतली जात नाही.परीक्षा यंत्रणेवरील गैरसमजुतीपोटी कारवाईचा आग्रह कायम राहिल्यास नाईलाजास्तव परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आम्हाला भाग पाडू नका असेही दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.परीक्षा कालावधीत आपल्या यंत्रणेमार्फत संबंधित केंद्रावरील कर्मचाºयांच्या बाबतीत कारवाई करण्याच्या संदर्भात वारंवार प्रसिद्धी दिली जाते. यामुळे शिक्षणक्षेत्र बदनाम होत असून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, परीक्षेचे कामकाज करण्यास अनुकूल नाही.परीक्षेत कॉपी व गैरप्रकार होऊ नयेत; यासाठी वेळोवेळी इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक, संस्थाचालक, परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक, शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची दक्षता समिती स्थापन करून परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात होण्याबाबत अनेक वेळा सभा बैठका घेऊन उद्बोधन नेहमीच करीत आलो असल्याचे निवेदनात म्हटले आहे.केंद्रातील कर्मचाºयांवर हल्ला होणार नाही, ही जबाबदारी शिक्षण विभागाने घेऊन, असा अनुचित प्रकार घडल्यास, खात्याच्या सक्षम अधिकाºयाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात यावी.बैठकीला समन्वयक संजय पवार, भरतसिंह भदोरिया, विजय बोरसे, बी.ए.पाटील, आर.व्ही.पाटील, वाय.एन. पाटील, देवानंद ठाकूर, एस.बी. सूर्यवंशी, महेश मुळे, डी.जे. मराठे, वाय.यू.कढरे, सुनील पवार, रवींद्र मोरे, आर. डी. शिसोदे, डी.बी.साळुंखे, प्रा. डी. पी. पाटील, कौसर शेख, इकबाल नजीर, शाहीद अख्तर, आय. एन.पठाण, लोटन मोरे, प्रफुल्ल बोरसे, लतिफ देशमुख, अबिद अन्सारी, जे. बी. सोनवणे, अशोक गिरी, जे.एच. पाटील, अकीम खान नजीम खान,              के. पी. चव्हाण, पी. बी. माळी  यांच्यासह अनेकजण उपस्थित               होते.जिल्हा समन्वय समितीने स्पष्ट केली भूमिका