शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या सामन्यासाठी शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:38 IST

करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी बळ

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : धुळे तालुक्यातील बिलाडी कुंडाणे शिवारातील आपल्या शेत जमिनीच्या बाजूला असलेल्या जुन्या नाल्यास कुठल्याही  शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वखर्चाने कोरून परिसरातील १००-१२५ हेक्टर जमिनीला जलयुक्त करून दुष्काळाशी सामना करण्यासाठी बळ देण्याचे काम जलदूत डॉ.भूषण सुभाषराव गवळे यांनी केले आहे.मातीविना शेती होऊ शकते पण पाण्या वाचून कधीच नाही, पाण्याचा थेंबन्थेंब महत्त्वाचा आहे. सर्व गोष्टीसाठी पाणीच महत्त्वाचे असून त्या पाण्याचा आपल्याबरोबर इतरांना फायदा कसा होईल याचा विचार करून कृतीत आणले आहे ते डॉक्टर गवळे यांनी. सदर नाल्याला खोदल्यामुळे व बांधबंदिस्ती करून दुरुस्ती केल्यामुळे पावसाळ्यात हा नाला मोठ्या शेततळे सारखा पाण्याने तुडुंब भरलेला असतो. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींची, कूपनलिकांची  जलपातळीत झपाट्याने वाढ झालेली आहे.  त्याचा फायदा दुष्काळाने होरपळणाºया शेतकºयांच्या मनाला आणि शेतातल्या पिकांना नवसंजीवनी देण्याचे काम डॉ.गवळे यांनी केले आहे.  त्यांनी गेल्या तीन वर्षापासून हळूहळू नाला खोलीकरण बांधबंदिस्ती केला. त्याचे छोटे तळे तयार केले आहे. त्या मध्ये साठलेले पाणी कोणालाही उपसू न देता गावातील गुरे, गायी, बकºया, मेंढ्या यांना पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. त्याचा उपयोग आजूबाजूचे शेतकरी, मेंढपाळ बांधव, गुरे, बकºयांना होत असून तेही समाधानी होत आहे. डॉ.भूषण गवळे यांनी बिलाडी कुंडाणे शिवारात स्वखर्चाने नाला खोलीकरण बांधबंदिस्ती करून शेततळे तयार केल्याने अशाप्रकारे तुडुंब पाणी त्यात भरले. त्यांनी नाला बांध बंदीस्त केलेले समाजपयोगी काम वाखणण्याजोगे असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. या पाण्यामुळे अनेकांना फायदा होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे