शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिरपूर तालुक्यात  २० हजार गॅस व लाखावर घरकुल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:41 PM

अर्थे : गरजूंना गॅस वाटपप्रसंगी खासदार हिना गावीत

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : नंदुरबार लोकसभा अंतर्गत आतापर्यंत १ लाख ४० हजार मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले आहे. या शिरपूर तालुक्यात २० हजार महिलांना गॅस कनेक्शन वाटप केले. तसेच आता पर्यंत या मतदार संघात १ लाख १० हजार गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.  सौभाग्य वीज योजनेसाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करून प्रत्येकाच्या घरापर्यंत वीज कनेक्शन मोफत दिले जात आहे. तसेच गावाचे व शेताचे वीज फिटर वेगवेगळे करण्यासाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी गॅस वाटपप्रसंगी दिली़ २९ रोजी अर्थे येथील कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅसजोडणी वाटपाचा कार्यक्रम झाला़यावेळी तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, सुप्रिया गावीत, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद पाटील, धुळे भाजपाचे चिटणीस संजय आसापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत पाटील, पंचायत समिती सदस्य दिलीप तडवी, रेमाल पावरा, वकवाडचे रावा पावरा, माजी जि.प.सदस्य रामदास कोळी, प्रफुल्ल पाटील, बाळु पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भास्कर बोरसे, शिंगाव्याचे सरपंच मधुकर पाटील, लोंढरेचे सरपंच डॉ.प्रदिप पाटील, जवखेड्याचे सरपंच कैलास पाटील, अंतुर्लीच्या सरपंच मिराबाई कोळी, रोहीणीचे बन्सिलाल बंजारा, उपसरपंच प्रशांत पाटील, डॉ.शशिकांत चौधरी, माजी सरपंच सुनील पाटील, अजंदेच्या सरपंच अन्नपुर्णा पाटील, गणेश माळी आदी उपस्थित होते.राहुल रंधे म्हणाले, तालुक्यात गॅस जोडणीचे काम जवळ जवळ पुर्ण झाले आहे. पण मध्यंतरी आचारसंहिता असल्याने काम थांबले होते. तालुक्यात विकासकामे चालु असतानाही विरोधक विनाकारण विरोध करत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कॉग्रेसने दुष्काळ व गॅस योजनांसाठी कारण नसताना मोर्चा काढला. तालुक्यात शिरपूर पॅटर्न राबविला असतांना दुष्काळची मागणी करण्यात विरोधाभास आहे.   खासदार हिना गावीत म्हणाल्या, तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.  महीलांचे पयार्याने संपुर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी गॅसजोडणी देण्यात येत आहे़ त्यामुळे डोळे, दमा, श्वसन, डोकेदुखी आदी आजार कमी होतील हा उद्देश होता. त्यावेळी या योजनेचा आदर्श गुजरातने घेऊन त्यांनीही ही योजना अंमलात आणली. तेव्हा कॉग्रेस अंतर्गत डॉ.गावितांना विरोध झाला होता. नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व गरजुंना गॅस उपलब्ध करण्यात येत आहे.  या कार्यक्रमात गरजुंना २ हजार ९२ पंतप्रधान उज्वला  मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यात दहिवद १०३, बलकुवे १०२, अंतुर्ली १००, बोराडी ९५, भरवाडे ८६, नटवाडे ८६, थाळनेर ८४, करवंद ८१, उंटावद ७९, नादर्डे ७६, न्यु.बोराडी ६८, बुडकी ६४, टेकवाडे ६०, गरताड ५९, जवखेडा ४६, निमझरी ४२, कळमसरे ४१, कुवे ३९, कोडीद ३९, बोरपानी ३८, वरुळ ३८, तºहाडकसबे ३७, मांडळ ३७, भटाने ३५, शिंगावे ३५, अहिल्यापूर ३४, गुºहाळपानी ३३, वाडी ३२, सावळदे ३२, खर्दे बु.३१, लौकी २७, फत्तेपूर २६, मुखेड २५, अजंदे खु. २४, अर्थे २४, विखरण २४, कुरखळी २३, उमर्दा १९, वासर्डी १८, झेंडेअंजन १६, वकवाड १६, चांदपुरी १५, टेंभे १५, नवे भामपूर १४, वाठोडे १२, सुभाषनगर १२, अमोदा ११, वरझडी ११, जुने भामपूर १०, जैतपूर ९, आढे ५, ताजपुरी ५, खामखेडा टेकवाडे २ असे एकूण  ५४ गावातील महिलांनासाठी गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे