शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

धुळ्यात जुनी पेन्शन योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 17:16 IST

जिल्ह्यातील शिक्षक एकवटले : जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे आंदोलन

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेकडो शिक्षक उपस्थितघोषणांनी परिसर दणाणला मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिले

आॅनलाइन लोकमतधुळे : सर्व कर्मचाºयांना जुनीच महाराष्टÑ नागरी सेवा अधिनियम १९८२   व १९८४ची पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी पासून वंचीत ठेवणारा २३ आॅक्टोबर २०१७चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी   महाराष्टÑ राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे  आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी शिक्षकांनी आणलेला घंटा वाजवून आंदोलकांनी शिक्षकविरोधी धोरणाचा निषेध केला. निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेत ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्टÑ नागरी सेवा अधिनियम  (निवृत्ती वेतन) १९८२ व १९८४ योजना व राष्टÑीय पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेतील कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे. त्याविरूद्ध आंदोलन करून जुन्या पेन्शन योजनेची मागणी करीत आहे. १४ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर विधीमंडळावर आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातील शिष्टमंडळाला वित्तमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. १६ मार्च १६ रोजी  मुंबईत धरणे व ७ डिसेंबर १६ रोजी नागपूर विधीमंडळ अधिवेशनादरम्यान एकदिवसीय उपोषण करण्यात ओ. मात्र मागण्यांची पूर्तता झालेली नाही.  सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भातील २३ आॅक्टोबर २०१७चा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.शिक्षकांच्या या घंटानाद आंदोलनाला अनेक शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.यावेळी संघटनेचे सागर पवार, श्यामकुमार पाटील, संजय पवार जयसिंग भुईटे,ज्ञानेश्वर बाविस्कर, संदीप पवार, मनोज परदेशी, जगदीश पाटील, भूषण सूर्यवंशी, सचिन राऊत, भास्कर परदेशी, योगेश धात्रक,  शुभांगी पाटील, सोनी पावरा, छाया परदेशी यांच्यासह जिल्हा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवानंद बैसाणे, शरद पाटील, रवींद्र खैरनार, राजेंद्र नांद्रे, चंद्रकांत सत्येसा, संजय पवार, चंद्रकांत पाटील, देवीदास महाले, विजय पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक