लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील पंचायत समितीच्या आमदार अमरिशभाई पटेल सभागृहात तालुक्यातील गुणवंत आशा स्वयंसेविकांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी आमदार काशिराम पावरा, ुजिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ़तुषार रंधे, पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, शिसाका संचालक जयवंत पाडवी, जि़प़सदस्या बेबीबाई पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, सहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंंद्राचे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आदी उपस्थित होते़यावेळी आमदार पावरा म्हणाले, आशा कार्यकर्ती समाजात त्यांच्या पदापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाने महान आहे़ तळागळापर्यंत पोहचणारी एकमेव आशा कार्यकर्ती असून कमी मानधनावर सर्मपण भावनेने काम करीत आहे़ तुमचे कर्तृत्व तुमच्या प्रतिष्ठेला वाढवत असते, असे विचार मांडले.जि़प़ अध्यक्ष डॉ़तुषार रंधे म्हणाले, मान्यताप्राप्त आरोग्य सामाजिक कार्यकर्ती समाज कार्यातील मोठी भगिनी व माता आहे़ आशा कार्यकर्र्तींची जागा गावागावात घरापासून चुलीपर्यंत सर्व प्रकारच्या सुख दु:खात जोडली गेली आहे़ तशी जागा तयार करणे इतर कोणासही जमणे अशक्य आहे़ पंतप्रधान मातृवंदन योजनेत तालुक्यात १०५ टक्के कामगिरी बजावण्याचे काम गौरवास्पद आहे़ आशा स्वयंसेविकांच्या कामाने तालुक्यातील आरोग्य सुविधा वृध्दींगत होत असून यापुढे त्यांच्या कामामध्ये सुसुत्रता तसेच आवश्यक सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध करून देता येईल़तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी यांनी राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत सुरू असलेल्या आशा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली़ सुत्रसंचालन हिरामण कुंभार, प्रास्तविक डॉ़प्रसन्न कुलकर्णी यांनी केले़
उत्कृष्ट कामगिरीबद्दल आशा स्वयंसेविकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:50 IST