शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

बेघरांना मिळणार हक्काचा ‘सातबारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:53 IST

प्रधानमंत्री घरकुल योजना : शासकीय, खाजगी जागेवरील अतिक्रमणधारकांचा समावेश 

धुळे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेने केद्र व राज्य शासनाची पंतप्रधान घरकुल योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे़ त्यानुसार बेघर, अतिक्रमीत व झोपडपट्टी धारकांना आता हक्काचा सातबारा उतारा देण्यात येणार असल्याचा निर्णय विशेष महासभेत घेण्यात आला़ मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मंंगळवारी सकाळी ११ वाजत विशेष महासभा घेण्यात आला़ यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अपंळकर, नवनिर्वाचित आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य उपस्थित होते़ सभेच्या सुरूवातील आर्किटेक्चर चेतन सोनार यांनी घरकुल योजना व निकषाची माहिती दिली़ असा मिळेल घरकुलाचा लाभमनपा तसेच खाजगी मालकीच्या १२४ झोपडपट्या आहेत़  ३९ घोषित झोपडपट्या, शासकीय मालकीच्या १३ मनपा मालकीच्या  १३, खाजगी १२, गावठाण  १ अशा १२४ झोपडपट्या आहेत़ अघोषित झोपडपट्टीत- २  मनपा शासकीय जागेवरील १३, खाजगी जागेवरील ४ अशा १९ झोपडपट्या आहेत़ विखुरलेल्या झोपडपट्या- शासकीय मालकी जागेवरील  ८, मनपाच्या जागेवर ४०, खाजगी १,  पदपथावरील १० अशा ५९ झोपडपट्या़ तसेच पदपथावरील ७ अशा एकूण १२४ झोपडपट्याचा समावेश आहे़ ९० हजार नागरिक झोपडपट्टीतशहरातील घोषित, अघोषित, विखुरलेल्या तसेच गावठाण व अतिक्रमन जागेवर १४ हजार ८८८ पेक्षा अधिक घरे आहेत़ त्यात सुमारे ८३ हजार ६१५ नागरिकांचे वास्तव्य ७० ते ८० वर्षापासुन वास्तव्याला आहे़ प्रधानमंत्री आवास योजनेतुन शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करून घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे़  तीन टप्यात घरकुलाचा लाभ घरकुल योजनेतील घटक क्रमांक दोनमध्ये नवीन बांधकाम, गृहखरेदी, सध्या राहत असलेल्या स्वमालकीच्या घराच्या विस्ताराकरिता बँकांमार्फत कर्जपुरवठा, घटक क्रमांक तीनमध्ये सार्वजनिक बांधकाम व खासगी भागीदारीतून विकसित होणाºया गृहनिर्माण प्रकल्पामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्रापर्यंतची सदनिका परवडणाºया दरात उपलब्ध, शासनाचे रक्कम अडीच लाखांपर्यंत अनुदान व चौथ्या घटकात स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधण्यास अथवा राहत्या घराची वाढ करण्यासाठी अडीच लाख अनुदान दिले जाणार आहे़वक्फ बोर्डबाबत निर्देश नाही़ही योजना राबवितांना शासकीय मालकीच्या जागा तसेच खाजगी जागासंबंधी स्पष्ट निर्देश असेल तरी  वक्त बोर्डाच्या मालकीच्या जागा आणि त्यावरील अतिक्रमण संदर्भात मात्र कुठल्याही स्पष्ट निर्देश नाही ़नाल्याकाठा ही न्याय द्या हगºया नाला, मोती नाला, सुशी नाला तसेच अन्वर नाल्यावर २० ते २५ वर्षापासून नागरिकांचे वास्तव्य आहेत़ आजपर्यत घरकूल विषयावर निर्णय घेण्यात आलेला नाही़  त्यामुळे अनेक  वर्षापासून नागरिक बेघर आहेत़ त्यांना देखील हक्कांचे घरकूल देण्यात यावे अशी मागणी सभेत नगरसेवक हिरामन गवळी यांनी केली़ यावेळी सभेत अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला़ 

टॅग्स :Dhuleधुळे