धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दहा महिन्यांपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिक व अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना लसपासून वंचित राहावे लागत होते. मात्र शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी पाठपुरावा करून अखेर बुधवारपासून देवपूर परिसरातील नागरिकांना घरोघरी लस उपलब्ध करून दिली आहे.
देवपुरातील प्रभात नगरातून घरोघरी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रभातनगरातील कमलाकर काशीनाथ भंडारी या ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला घरी जाऊन लस देण्यात आली. लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, डॉ. पल्लवी रवंदळे, डॉ. शिंदे, उपजिल्हाप्रमुख किरण जोधले, महानगरप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख सतीश महाले, उपमहानगरप्रमुख देविदास लोणारी, माजी शहरप्रमुख चंद्रकांत गुरव, माजी नगरसेवक नितीन शिरसाठ, उपमहानगर प्रमुख ललित माळी,राजेंद्र मराठे, हरीश माळी आदी उपस्थित होते.