लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय खेत मजुरी युनियन यांच्यातर्फे देशव्यापी जनजागृती मोहिम आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे़ यासंदर्भात तहसिलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले़ त्यानंतर कोरोना काळातील वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली.२० रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय खेत मजुरी युनियन यांच्यातर्फे तहसिलदार आबा महाजन यांना कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली.शेतकऱ्यांना मागणीनुसार खते, बी-बियाण्यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांचे सावकारी, सहकारी व खाजगी अशा प्रकारची कर्जमाफी ताबडतोब जाहीर करावी. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या शेतकरी, शेतमजूर व कामगारांना ५० लाख रूपये भरपाई द्यावी. प्रत्येक किसान परिवारास १० हजार प्रोत्साहन भत्ता द्यावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची १८ हजार रूपयांची तरतुद करावी. सी२ अधिक ५० टक्के धरून शेतीमालाला किसान हमीभाव देऊन भाजीपाला, फळे, अंडी, मध, दुध शेतीमालाचे दर ठरवावेत. वाढती महागाई कमी करून भाववाढीवर आळा घालण्यात यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच ५ आॅगस्टपर्यंत महाराष्टÑभर आंदोलन करण्याचे ठरले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.यावेळी अॅड़मदन परदेशी, कॉ.अर्जुन कोळी, अॅड़हिरालाल परदेशी, अॅड़संतोष पाटील, कॉ.रामचंद्र पावरा आदी उपस्थित होते़
वाढीव वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 22:23 IST