साक्री/पिंपळनेर : अतिवृष्टीमुळे व शेत शिवाराचे नुकसानीमुळे सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्यात येणार असून त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून महसूल खाते व कृषी विभागाच्या वतीने लवकरच शेतकºयांसाठी मदत केंद्र सुरु करणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी साक्री येथील पत्रकार परिषदेत सांगितले.साक्री तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून व अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालक मंत्री दादा भुसे तसेच आमदार मंजुळा गावित यांनी मंगळवारी पाहणी दौरा केला. काटवान भागातील विटाई, बेहेड, दारखेल, निळगव्हाण, नाडसे, छाईल, कासारे, गणेशपुर आदी भागातील पिकांची पाहणी केली. या वेळेस उपस्थित शेतकº्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची किती नुकसान झाले याची माहिती दिली.त्यानंतर त्यांनी साक्री येथे पत्रकार परिषदेत बोलताना शेतकºयांच्या पाठीशी सरकार असून त्यांना हेक्टरी २५ हजार तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानंतर शेतकºयांच्या हेक्टरी आर्थिक नुकसान हे निकष लावून उर्वरित मदत देण्याची मागणी त्यांनी केली.यावेळेस पालकमंत्री भुसे यांनी ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे त्या त्यांच्यासाठी तसेच इतर शेतकºयांसाठी सरसकट पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वांना आर्थिक मदत मिळणार असून शेतकºयांनी धीर सोडू नये. विमा कंपन्यांनाही शासनाने आदेश दिले आहेत. मानवतेच्या भावनेतून शेतकºयांना मदत करावी. शेतकरी गोंधळलेल्या परिस्थितीत असून अशा शेतकºयांना मार्गदर्शन व्हावे म्हणून कृषी विभाग व महसूल विभागाच्या वतीने तात्काळ मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन म्हणून ते विमा कंपन्यांकडे आपला अर्ज सादर करू शकतील. यासंदर्भात संबंधित बँकांनाही कळविण्यात आले आहे. कृषी विभागाने पिक विमा काढलेल्या शेतकºयांच्या याद्या तात्काळ कृषी विभागाकडे द्यावेत, अशा बँकांना सूचना करण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. यावर्षी २११ टक्के पाऊस झालेला आहे. आतापर्यंत ६० टक्के पंचनामे झाले असून येत्या दोन दिवसात शंभर टक्के पंचनामे होणार आहेत. संकटग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यावर थेट मदत देण्यात येणार आहे. शेतकºयांकडे असलेली कोणतीही सक्तीची वसुली करण्यात येऊ नये, असे आदेश संबंधित विभागाला दिल्या. शेतकºयांच्या मुलाला शैक्षणिक मदत देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे भविष्यात चाराटंचाई होणार असून त्या दृष्टीनेही शासन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वेळेवर पंचनामे व्हावेत म्हणून सर्व कर्मचाºयांच्या रजा रद्द केल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड, शेती पाईपलाईन वाहून गेले आहेत. त्यांच्यासाठीही शासनस्तरावर मदतीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.या पाहणी दौºयात शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, नरेंद्र गुजराथी, शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा संघटक पंकज मराठे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, बांधकाम विभागे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, साक्री पं.स. उपअभियंता संजय बांगर, नायब तहसीलदार असटकर, पिंपळनेर अप्पर तहसीलदार थविल साक्रीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे आदी उपस्थित होते.काटवनातील पाहणीनंतर पालकमंत्री भुसे यांनी दहिवेल भागातील काही गावांना पाहणी केली. साक्री येथील विश्रामगृहात तालुक्यातील शेतकºयांचे निवेदन स्वीकारले व मदतीचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांसाठी मदतकेंद्र सुरु करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:03 IST