ग्रामपंचायतीने कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या निवासस्थानी राहून नियमित व वेळेवर उपस्थित राहावे. कापडणे गावात कोरोना परिस्थिती असल्याने सध्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त होत असल्याने आरोग्य विभागातील आस्थापनेतील कर्मचारी पूर्ण कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परंतु कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात. जे कामात कुचराई करत असतील, त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी. कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची परिस्थिती असेपर्यंत मुख्यालय निवासस्थानात राहणे अनिवार्य करा. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल ग्रामपंचायत कार्यालयाला सादर करावा.
हे पत्र कापडणे ग्रामपंचायतीमार्फत कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी, धुळे यांना देण्यात आले आहे.