कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावर आवर घालण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना लोकाना मात्र त्याचं गांभीर्य दिसून येत नाही. ग्रामीण भागात आता कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे. गावोगावी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तरीही ग्रामस्थांना मात्र कोरोनाची भीती वाटत नाही. गावातील मुख्य चौकामध्ये घोळका करून बसणे, मास्क न घालता गर्दीत उभे राहाणे, दुकाने सर्रास सुरू ठेवणे हे राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होताना दिसून येत आहे. शासनाने कडक लाॅकडाऊन सुरू असताना खेडे गावात मात्र हे सर्व नियम मोडित निघत असल्याचे पाहून मोहाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय मुस्तफा मिर्झा यांनी शनिवारी ६ वाजेदरम्यान गावात आले असता मास्क न लावणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही सुरू केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच वचक निर्माण झाला तसेच पीएसआय मिर्झा यांनी ग्रामस्थांना मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी न करता सोशल डिस्टन सॅनिटायझरचा वापर करा, गावात हायड्रोक्लोरिकची फवारणी करून सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. गावात मास न वापरणाऱ्यांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
पोलीस गाडी येताच झाली पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST