शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

धुळे शहरात जुने धुळे परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:09 IST

पांझराकाठच्या रस्त्यांना होता अडथळा, धार्मिक स्थळे जमिनदोस्त

ठळक मुद्दे- तीन ते चार मंदिरांसह स्मशानभूमीचे अतिक्रमण काढले- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाºयांना अटक- विरोध मोडून काढत पोलीस बंदोबस्तात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या अकरा किमीच्या रस्त्यांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील अतिक्रमणे सोमवारी चोख पोलीस बंदोबस्तात जमिनदोस्त करण्यात आली़ धार्मिक स्थळांसह स्मशानभूमीचा त्यात समावेश होता़आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत़ या रस्त्यांच्या कामांना जुने धुळे परिसरातील लिंगायत समाजाची स्मशानभुमी व त्यालगत असलेली मंदिरे, दर्गा यांचा अडथळा ठरत होता़ त्यामुळे संबंधित अतिक्रमणे काढण्यासाठी आमदार अनिल गोटे हे ३० मार्चला रात्री बांधकाम विभागाच्या पथकासह पोहचले असता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी व परिसरातील नागरिकांनी त्यांना विरोध केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर आमदारांच्या निषेधार्थ शिवसेनेने मोर्चाही काढला होता़ दरम्यान, सोमवारी जुने धुळयातील अतिक्रमण अखेर हटविण्यात आले़ या कारवाईपूर्वी पोलीसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा़शरद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक पोलीस बंदोबस्तात जेसीबी, ट्रॅक्टरसह सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जुने धुळे परिसरात दाखल झाले़ सुरूवातीला नागरिकांसह महिलांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे विरोध मावळला़ त्यानंतर स्मशानभूमीच्या जागेसह धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले़ या कारवाईवेळी बरीच गर्दी झाली होती़ सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते़  

टॅग्स :Dhuleधुळेpwdसार्वजनिक बांधकाम विभाग