शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हेअर सलून व्यावसायिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:09 IST

शिरपूर : घरी सेवा देण्याचीही कोरोनामुळे धास्ती, कटींगची सोय नसल्याने नागरिकही बैचेन

शिरपूर : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा समाजातील कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या घटकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे़ राज्यातील सलून चालकांनाही संचारबंदीची मोठी झळ बसली आहे़ सरकारने सोशल डिस्टनसिंगचे आवाहन केले आहे़ आमचा मात्र ग्राहकाशी थेट शारीरिक संपर्क होतो, त्यामुळे घरी जावूनही सेवा देणे शक्य नसल्याचे शहरातील करवंद नाक्याजवळील राज मेन्स पार्लरचे संचालक तथा तालुका संघटनेचे अध्यक्ष रामचंद येशी या व्यावसायिकांचे म्हणणे आहे़संचारबंदी लागू करण्यापूर्वीच सलून चालकांनी आपली दुकाने बंद केली होती़ पुणे व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर तरूण शहरात दाखल झाले आहेत़ भीतीपोटी आपण संचारबंदीपूर्वीच दुकान बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले़ शिरपूर शहरात १४० ते १५० सलून चालक आहेत़ सर्वच दुकाने सध्या संचारबंदीमुळे बंद आहेत़ काही प्रमुख चालकांकडे कारागीर कामाला आहेत़ त्या कारागिरांचीही आता उपासमार होत आहे़ सलून व्यवसाय हा चालक व ग्राहकांच्या मैत्रीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो़ या व्यवसायात ग्राहकांत व चालकांमध्ये आपुलकीचा स्रेहभाव तयार होतो़ अनेकदा पैशांपेक्षा हे संबंध टिकविण्याचा चालक व ग्राहक दोघांकडूनही प्रयत्न असतो़ सेवा क्षेत्रातील हा व्यवसाय असल्यामुळे ग्राहकांना समाधान देण्यात आपल्याला आनंद मिळतो असे रामचंद्र येशी यांचे म्हणणे आहे़ कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने आता सोशल डिस्टनसिंग हा शब्दप्रयोग करत एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन किंबहुना सक्ती केली आहे़ त्यामुळे चालक अडचणीत सापडले आहेत़ संचारबंदीमुळे दुकान जरी बंद ठेवले असले तरी अनेक ग्राहक घरी येवून सेवा देण्याची चालकांना विनंती करत आहेत़ वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध तुटण्याची भीती आहे़ कामादरम्यान थेट शारीरिक संपर्क येत असल्यामुळे मनात भीती आहे़ थोड्याशी पैशांकरीता मोठी जोखीम आहे़ त्यामुळे आम्ही नकार कळवत आहेत़ दाढी व कटींगच्या साहित्याचे निर्जंतुकीकरण केले तरी त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका टळत नाही़ ग्राहकांना प्रत्यक्ष स्पर्श करावाच लागतो असे येशी यांनी सांगितले़ दरम्यान, नाभिक संघटनेने सलून चालकांच्या होणाºया उपासमारीची दखल घेतली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे