लोकमत न्यूज नेटवर्कबळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील तरुणांसाठी व्यायाम शाळा सुरू करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच करण्यात आला.साक्री तालुक्यातील बळसाणे गावातील तरुणांनी लहानपणापासूनच व्यायाम करून शरीर तंदुरस्त ठेवून शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे. युवकांनी व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवावे, असे आवाहन ही महावीर जैन यांनी केले. बळसाणे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गावातील तरुणांसाठी व्यायाम शाळा सुरू करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी व्यायाम शाळेच्या भुमीपूजन प्रसंगी व्यक्त केले.भूमिपूजन लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले. नामदार दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुलच्या निधीमधून यासाठी निधी मंजूर करण्यात आला.लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे व महावीर जैन हे व्यायाम शाळेसाठी नेहमी पाठपुरावा करत राहिले आणि या पाठपुराव्याला यश आले.याप्रसंगी सरपंच दरबारसिंग गिरासे, उपसरपंच लक्ष्मण मासुळे, ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन, देविदास धनुरे, सुदाम खांडेकर, बापू माळचे, पो.पा. आनंदा पाटील, कैलास खांडेकर, योगेश महाजन, वशिम पठाण, पंकज धनगर, कार्यकर्ते, तसेच तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बळसाणेत व्यायामशाळेचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:38 IST