शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

आयुष्याला पुर्णत्व देण्यासाठी गुरूचा मोठा मिळाला आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:16 IST

राजेंद्र भारूडे : आई, गुरू आणि ज्याच्या सहवासात राहिलो त्या निसर्गाची मिळाली साथ

विशाल गांगुर्डे । लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील सामोडे गावात वाढतांना कधी मी आयएएस होण्याचे स्वप्न बघितले नव्हते, आज सोलापुर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम करतांना जवळच्या, लहान पणातील आठवण व गुरूजीची शिकवण कधी विसरू शकत नाही़ गुरूजींच्या या शिकवणीचा सर्वात मोठा वाटा आहेत तो, त्यांच्या निस्वार्थ भावनेने केलेले प्रेम आणि कलेला भक्कम पाया माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारी आहे़ मानसाने माणसासारखे वागावं,जाती धर्माच्या काठीने बघु नये, त्यामुळे लहानपणाच शिक्षण सार्वजनिक शाळेत झाल म्हणुन प्राथमिक शिक्षणाचा पाया शिक्षकांमुळे पक्का होऊ शकला़ दुसरे जे शिक्षक म्हणजे माझी आई : जी स्वत: काबाडकष्ठ करून पहाटे चार वाजता उठायची घरातील सर्वकामे, दारू गाळ्ण्यापासुन, मुलांना तयार करण्यापासुन स्वयंपाक करतांना आईला कधी थकवा आला नाही, आजार जाणवला नाही़ त्यामुळे आम्हालाही तशी स्वयस्पुर्ती, प्रेरणा कितीही दु: ख असले मानसाने त्या दु:खाचा बाहू न करता त्याला सक्षमपणे झुंज कधी देत राहावी याच एक उत्तम उदाहरण हे घरीच पहायला मिळाले होते़   तिसरे गुरू म्हणजे निसर्ग आजच्या जगात नदी असतील उदा आमची जामखेली नदी, डोंगर असतील व राणमळा असेल किंवा मित्रासोबत जाऊन डोंगरावर फिरने, चढणे असेल यासर्व गोष्ट्री मनामध्ये कुठेतरी पुर्णत्वाची भावना देत होती ती आज शहरी भागात मिळत नाही़ पाणी नदी हटलं खेळण आलचं त्यात कृतीम खेळण्याची गरज पडली नाही़ मित्रांसोबत खेळणे असले, झाडावर चढणे, डोंगरावर चढणे यासर्व गोष्टी मनामध्ये व्यापतात निर्माण करत होती़ म्हणुन ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये घरात परिवारात शिक्षक असतील किंवा आदर्श शिक्षक असतील आणि निसर्गामध्ये शिक्षक शोधत बसतील त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जडण-घडण नख्खीच होणार माझा विश्वास आहे़ असा मी घडलो, असे आपणही नक्कीच घडा व देशाची सेवा करा़ आयुष्यात मेहनत केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येवू शकत नाही़  

टॅग्स :Dhuleधुळे