शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 22:54 IST

गुरुपौर्णिमा : जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, मंदिरांमध्ये उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सदगुरु सारखा असता पाठीराखा. या भावनेतूनच गुरुपौर्णिमेला गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरु पुजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रुहाणी मानव केंद्रपिंपळनेर- गुरुपौर्णिमेनिमित्त येथील रुहाणी मानव केंद्रात आदीत्य फाऊंडेशन व सुहरी हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग् निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. यात डॉ.जितेश चौरे, डॉ.योगिता चौरे, डॉ.कैलास पगारे, डॉ.संजय बोरसे, डॉ.एस.आर. महाले यांनी विविध आजारांचे निदान करुन मोफत औषधोपचार देण्यात आले. शिबिरास रिखब जैन, जिल्हा रुग्णालयाच्या प्रमिला गोरख पाटील, हिरे मेडिकल कॉलेजचे सुलाभाई नाईक, दुर्गेश सोनवणे, पूनम सोनवणे, सुहरी हॉस्पिटलचा नर्सिंग कर्मचारी सीताराम अहिरे, दत्तू सांगळे, हिरालाल भारुडे, अक्का माळी, सुधा बोरसे, विमल ठाकरे, ज्योति पवार, अक्का गांगुर्डे, प्रविण पवार, वर्षा कोकणी यांनी सेवा देवून सहकार्य केले. एम.एच.एस.एस. महाविद्यालयशिंदखेडा - येथील एम एच एस एस कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रा. दीपक माळी होते. यावेळी प्रा.परेश शहा यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला.  यावेळी गुरू-शिष्याचे नाते समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात हे विशद केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिपक माळी यांनी आजच्या काळात पुस्तक हा आपला गुरू असून वाचनामुळे माणूस समृद्ध व खºया अर्थाने शिक्षित होतो. पुस्तक वाचनाने व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल घडून येतो व समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी कार्य करण्याचा मार्ग वाचनातून मिळतो. विद्यार्थ्यांनी वाचनात जीवनाला स्थान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रा. जी के परमार यांनी तर सूत्र संचालन प्रा. पी.टी. पाटील यांनी केले. आभार  प्रा. सी.डी. डागा यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले होते.साई मिरवणूकसोनगीर -  येथील इंदिरानगर मधील श्री साई श्रद्धा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळ पासून साईबाबा मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी पाच वाजता साईबाबांच्या मुर्ती व पादुकांचे दुग्धाभिषेक करण्यात आले. सायंकाळी गावातून वाजंत्रीसह भव्य पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. रात्री समता परिषदेचे जिल्हाकार्याध्यक्ष आर.के. माळी व गोरख दौलत पाटील यांच्या सपत्नीक हस्ते महाआरती करण्यात आली. आरती नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ    घेतला.यावेळी साई श्रद्धा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भोई, अध्यक्ष प्रकाश भोई, सुनील भोई, राहुल भोई, महेंद्र माळी, योगेश माळी, अजय भोई, कुंदन माळी, गोपाल धनगर, कल्पेश माळी, गणेश मिस्तरी, राहुल सुतार, शैलेश वाणी, महेंद्र भोई, किरण माळी, पंकज भोई, विशाल भोई, गोलू भोई, समाधान भोई व श्री साई श्रद्धा गृप, आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये उत्सवमालपूर- येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य थॉमस यांनी गुरु महिमेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. अनेक प्रसंगासह गुरुशिष्याची जोडी व महतीची आठवण करुन दिली. संस्था चेअरमन युवराज सावंत यांनी विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही मनोगते व्यक्त करुन गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. १२ जुलै रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीत मोठ्या उत्साहात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूलसाक्री- येथील श्री छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा सन्मान करत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी.एम. भामरे होते. या प्रसंगी विद्यार्थिनी व भारती पाटील या शिक्षिकांनी गुरूपौर्णिमेविषयी माहिती दिली. बी.एम. भामरेंनी प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जडणघडणीसाठी ज्या ज्या गुरुजनांनी आपल्यावर संस्कारांचे घाव घेतलेत त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रोहिणी नेरे यांनी मानले.

टॅग्स :Dhuleधुळे