निजामपूर : साक्री तालुक्यात खुडाणे येथे संत सावता गणेश मित्र मंडळाने यंदाच्या आठव्या वर्षीही मानाच्या गणपतीची स्थापना उत्साहात केली आहे.खुडाणे येथे हा एक गाव एक गणपती असून मंडळ गुलालमुक्त उत्सव साजरा करीत आहे. शिवाय हे मंङळ नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असते. त्यात वृक्षारोपण, व्यसनमुक्ती विषयी प्रबोधनचा समावेश आहे. हा गावाचा मानाचा गणपती असून सर्वाच्या मनोकामाना बाप्पा पूर्ण करतो अशी श्रद्धा गावातील ग्रामस्थाची असल्याची माहिती पराग माळी यांनी माहिती दिली.अध्यक्ष- धनराज माळी, उपाध्यक्ष- राहुल गवळे, सचिव - बबलु महाजन, खजिनदार- मनोज माळी, सदस्य - नाना माळी, शरद गवळे, शिवाजी गवळे, पराग माळी, भरत खैरनार, शरद सोनार, नाना माळी, पोपट बाविस्कर, निलेश शाऊत, गणेश खैरनार, महेश गवळे यांचा समावेश आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन सातव्या दिवशी वाजत गाजत करण्यात येणार आह. यावेळी धरणगाव येथील विनोद वीर पागल खुटा येऊन धमाल मनोरंजन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान एकगाव एक गणपतीमुळे गावात एकोप्याचे दर्शन घडून येत आहे.
खुडाणे येथे गुलालमुक्त उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:40 IST