लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : संत तुकोबारायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहीलेले अभंग मानवी जीवनाच्या कल्याणासाठी आजही व पुढेही दिशादर्शक ठरतील, अशा अभंगांचे पारायण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाचे गोविंदराव ठाकरे यांनी केले.साक्री तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे गोविंदराव ठाकरे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्राचार्य बी.एम. भामरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक नांद्रे, धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन दहिते, साक्री तालुका भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष वेडू आण्णा सोनवणे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, मराठा सेवा संघाचे सचिव डॉ.सचिन नांद्रे, संघटक शितल सनेर, प्राचार्य डॉ.राजेंद्र आहिरे, अनिल अहिरे, पी.झेड. कुवर, विजय भोसले, विकी सोनवणे, जितेंद्र अहिरराव, कैलास नेरकर, योगेश नेरे, धमनारचे सरपंच दिनेश सोनवणे, ललीत सोनवणे, वारकरी संप्रदायाचे दिलीप देवरे, एन.एस. मोरे, डी.के. बोरसे, राकेश दिक्षित, सुनील देवरे, ह.भ.प. राजेंद्र बोरसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते संत तुकाराम महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी हर्षवर्धन दहिते, वेडू सोनवणे व गोविंदराव ठाकरे यांचा विविध पदावर निवड झाल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.गोविंदराव ठाकरे पुढे म्हणाले, तुकोबांच्या अभंगाच्या ओवी ह्या सुविचार जसे ठरले आहेत, तसे ते आजच्या घडीला समाजाला दुरगामी पथदर्शक ठरले आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ.सचिन नांद्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल सनेर, दिपक नांद्रे, सुनील देवरे, विकी सोनवणे, जितेंद्र अहिरराव, योगेश नेरे, प्रमोद नेरकर, निलेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत तुकोबांचे अभंग जीवनाच्या कल्याणासाठी दिशादर्शकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:42 IST