शनिवार १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता बोरकुंड येथे आगमन, बोरकुंड व रतनपुरा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, दुपारी १ वाजता बोरकुंड येथून धुळेकडे प्रयाण, दुपारी २.५० वाजता गुलमोहोर शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, धुळेकडे प्रयाण, दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील कोरोना विषाणू विषयक उपाययोजनांबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालय होईल. रविवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८. ५५ वाजता गुलमोहोर शासकीय विश्रामगृह धुळे येथून जिल्हाधिकारी कार्यालय, धुळेकडे प्रयाण, सकाळी ९.०५ वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हास्तरीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती, ध्वजारोहण, सलामी व भाषण स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १०.३० वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना युवासेना व आईसाहेब सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महारक्तदान शिबिराचे उदघाटन होईल. सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्याकडील मंजूर अनुदानातून जिल्हा कारागृह येथील वर्ग एकच्या बंद्यांसाठी स्वयंपाकगृहात भोजन सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्राप्त यंत्रसामग्री उदघाटन सोहळा व कारागृह भेट, स्थळ- जिल्हा कारागृह, धुळे, दुपारी १२ ते १ या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ते हरणमाळ या रस्त्याचे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांच्यासमवेत लोकार्पण त्यानंतर सोयीनुसार गुलमोहोर शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमन व राखीव त्यानंतर सोयीनुसार धुळे येथून औरंगाबादकडे प्रयाण होईल.
पालकमंत्री अब्दुल सत्तार आजपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST