धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आज, शनिवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. २३ जानेवारीला सकाळी नऊ वाजता वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन, शिवसेना जिल्हा कार्यालय येथे सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मनोहर चित्रमंदिरापासून मोटारसायकल रॅलीने धुळे शहरातील विविध ठिकाणी शिवसेना शाखांचे उद्घाटन, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त महिलांना साडी वाटप, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत राखीव, स्थळ- शासकीय विश्रामगृह, धुळे, दुपारी तीन वाजल्यापासून धुळे शहरातील शिवसेना शाखा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी ६.३० वाजता शिवसैनिकांचा भव्य मेळावा, स्थळ - राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह, धुळे, सायंकाळी ७.३० वाजता प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठकीनंतर प्रयाण होणार आहेत.
पालकमंत्री अब्दुल सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST