शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

शहरातील वाढणारे खड्डे ठरताय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:20 IST

महापालिका : वर्दळीच्या रस्त्यांची होतेय दयनीय अवस्था, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजीचा सूर

धुळे : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे़ आमदार डॉ़ फारुक शाह यांनी बैठक घेऊन पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते़ वेळोवेळी याकडे लक्ष देखील वेधण्यात आले़ परंतु खड्डे बुजण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही़ परिणामी खड्डामधून वाहन नेताना नाराजीचा सूर वाहनधारकांकडून व्यक्त केला जात आहे़ शहरातील खड्डे कधी बुजविणार या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशीत करुन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता़ परिणामी पंचवटी परिसरातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याजवळील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले़ सद्यस्थितीत हेच काम अर्धवट सोडून दिल्याचे समोर येत आहे़ वाडीभोकर रोड, लेनिन चौक, पोलीस मुख्यालयाजवळील रस्ता यासह ठिकठिकाणी आजही खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसते़ वाहनधारकांकडून याबद्दल वेळोवेळी नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे़ निधी मिळून देखील याकडे का दुर्लक्ष केले जाते? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे़ मोठ्या अपघातानंतर लक्ष देणार का?शहरातील लेनिन चौक आणि पोलीस मुख्यालयाजवळील रस्ता तसेच बारा पत्थर भागात आणि अन्य ठिकाणी रस्त्यावर मोठे आकारचे खड्डे पडलेले आहे़ यातून वाहन गेल्यानंतर अपघात होण्याचा धोका वाढलेला आहे़ रात्रीच्या वेळेस तर हमखास अपघात होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ वेळोवेळी लक्ष वेधून देखील प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना काही दिसत नाही़ महापालिकेच्या सभांमधून सुध्दा खड्यांचा हा विषय चर्चेत आलेला आहे़ यावर तात्पुरत्या स्वरुपात चर्चा होते़ मात्र, ठोस उपाययोजना होताना काही दिसत नाही़ रस्त्याची दुरुस्ती होत नाही की खड्डे बुजविले जात नाही, अशी स्थिती असताना दरवर्षी लाखों रुपयांचा निधी नेमका खर्च होतो कुठे? असा प्रश्न उपस्थित होतोय़

टॅग्स :Dhuleधुळे