धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे येण्यावर तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध आहेत. शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागावे. तसेच घरी राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.दरम्यान, महापरिनिर्वाणदिनी शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अभिवादन होणार आहे.
बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:09 IST