धुळे : शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी या तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्यावतीने जल्लोष करण्यात आला. त्यात नागरिकही उत्साहाने सहभागी झाले. फटाक्यांची आतषबाजीसह घोषणा देत कार्यकर्त्यांनी नृत्यही केले.धुळ्यात एलईडी स्क्रीनची व्यवस्थाहा शपथविधी समारंभ सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावा यासाठी शिवसेनेच्यावतीने आग्रारोडवरील मुख्य बाजारपेठ, देवपूर व भगवा चौक या तीन ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.या प्रसंगी आग्रारोडवर रवींद्र रणसिंग, महेश मिस्तरी, विजय भट्टड, मिलिंद मुंदडा, नंदू येलमामे, शकील ईसा, योगेश चौधरी, बंटी सोनवणे, हेमंत देशमुख, प्रशांत जैन, जालंदर जगताप, दीपक गुलाले, विजय शुक्ल, भरत ताथेड हे तर भगवा चौकात रामदास कानकाटे, कैलास मराठे, सुरेश जडे, मयुर कुलकर्णी, सागर गोरे, विष्णू प्रजापत, सुरेश पटेल, विक्रम नवाळे, जयेश पाटील, उमेश कानकाटे, भटू पाटील, राम परदेशी आदींसह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिरपुरात ढोलताशांचा दणदणाटशिरपूर- शहरातील पाच कंदिल चौकात महाविकास आघाडी व शिरपूर स्वाभिमानी विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जल्लोष साजरा करण्यात आला़ मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीवेळी जल्लोष सुरू झाला. महाआघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाचकंदिल चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर ढोल ताशांचा गजरात फटाके फोडत जल्लोष साजरा करून पेढे वाटप करण्यात आले़यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिंमत महाजन, तालुकाध्यक्ष भरत राजपूत, कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, राजेश गुजर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती पावरा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, प्रविण देशमुख, लिलाचंद लोणारी, निलेश गरूड, भैय्या पाटील, मिलिंद पाटील, रामकृृष्ण पाटील, शाम पाटील, ईश्वर बोरसे, अरूण दलाल, अभिमन भोई, उत्तम माळी, नितीन निकम, अशफाक शेख, सचिन शिरसाठ, योगेश ठाकरे, सलिम तेली, अॅड़दीपक करंकाळ, जयवंत शिरसाठ, कांतीलाल पाटील आदी विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते़निमगुळला कार्यकर्त्यांचा जल्लोषनिमगुळ- शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील बसस्थानक परिसरात शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत नव्या सरकारचे जल्लोषात स्वागत केले.निमगुळ येथील शिवसेना विभाग प्रमुख कल्याण बागल, विनोद शिरसाट, समाधान शिरसाठ, राज शिरसाट, भैया पाटील, राष्ट्रवादीचे आशिष बागल, हरी पवार, उमेश बागल, निनाद शिंदे, अनिल कोळी, अनिल फौजी, वासुदेव शिंदे, आप्पा चित्ते, संभाजीराव बागल, जितू शिंदे, नवीन कोळी, भिला बागल, सुयोग शिंदे, महेंद्र सैंदाणे, ग्रा.पं. सदस्य हरी कुवर आदी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व जयघोष केला. या प्रसंगी शरद पवार यांचे मोठे कटआउट लावण्यात आले होते.
महाविकास आघाडी सरकारचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:40 IST