शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्धर आजारावर मात करण्यासाठी सरकार जनतेच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:23 IST

देवेंद्र फडणवीस : धुळ्यात खान्देश कॅन्सर सेंटर व राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ

ठळक मुद्देगरीब, गरजू रुग्णांना आपल्या गावातच उपचार मिळायला हवे, या विचाराने डॉ. भूषण वाणी, डॉ. राहुल भामरे व डॉ. भूषण नेमाडे या तिघांच्या संकल्पनेतून खान्देश कॅन्सर सेंटर शहरातील चक्करबर्डी परिसरात उभे राहणार आहे. शहरातील कुमारनगर येथील थॅलेसेमीया आजाराने त्रस्त १४ वर्षीय सुमीत प्रमोद रेलन याच्या औषधोपचाराचा खर्च मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचलल्याने या मुलाने कार्यक्रमात मुख्यमंत्र्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कॅन्सर आजाराचे प्रमाण उत्तर प्रदेश राज्याच्या सर्वाधिक आढळून येते. त्याखालोखाल महाराष्टÑ राज्याचा क्रमांक लागत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी येथे दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अलीकडे कॅन्सरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी  मोठा पैसा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत  अनेक, गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाही.  मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी सरकार गरीबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आपल्या महाराष्टÑात पैशांमुळे उपचार होऊ शकले नाही, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. धुळ्यात सोमवारी खान्देश कॅन्सर सेंटरचा भूमीपूजन सोहळा व राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरासमोरील रस्त्यावर झाला. मंचावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे,  वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे,  खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मीता वाघ, आमदार शिरीष चौधरी,  जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा, कॅन्सर सर्जरी विभाग प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. बिना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आरधना भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, बबन चौधरी, हिरामण गवळी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले. कॅन्सर आजारावर महात्मा फुले योजनेंर्गत मोफत उपचार कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर सरकारतर्फे महात्मा फुले या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जात आहे. यासाठी सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांच्या सहकार्यातून ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे उपचारासाठी पैसा नसेल, तर थेट आमच्याशी संपर्क साधावा, गरजूंना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले. 

रुग्णांच्या चेह-यावरील हास्य हीच खरी संपत्ती कॅन्सरवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. मात्र, गरजू रुग्णांना अल्प दरात उपचार करून देणे गरजेचे आहे. पैसा कमविण्यापेक्षा रुग्ण बरे होऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले पाहिजे. त्यांच्या चेहºयावरील हास्य हीच खरी संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.