शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : राेहयोमध्ये शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठीही पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

धुळे : रोजगार हमी योजनेत आता शेततळ्यासोबतच अस्तरीकरणासाठीदेखील पैसा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत शेततळे खोदकामासाठी केवळ अकुशल ...

धुळे : रोजगार हमी योजनेत आता शेततळ्यासोबतच अस्तरीकरणासाठीदेखील पैसा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आतापर्यंत शेततळे खोदकामासाठी केवळ अकुशल निधी मिळत होता. परंतु आता अस्तरीकरणासाठी कुशल निधी दिला जाणार आहे. यापूर्वी मंजूर कामांना याचा लाभ मिळणार नाही, परंतु नवीन मंजूर होणाऱ्या कामांना अस्तरीकरणाचा लाभ मिळणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत शेततळ्यासोबतच आता प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठीही खर्च दिला जाणार आहे. शेततळे खोदण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनुदान योजनेत प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेत मजुरीचा दर २३८ रुपये आहे. इनलेट व आऊटलेटविरहित मजुरांद्वारे होणाऱ्या खोदाईचे आर्थिक मापदंड बघता ३० मीटर लांबी, ३० मीटर रुंदी आणि ३ मीटर खोलीच्या शेततळ्यासाठी एकूण ५ लाख ६८ हजार ३८० रुपये उपयोजना डोंगरी भागासाठी गृहीत धरण्यात आली आहे. तसेच इतर क्षेत्रासाठी ही रक्कम ५ लाख १४ हजार ८९५ रुपये अपेक्षित आहे. रोजगार हमी योजनेच्या अपर मुख्य सचिवांनी जारी केलेल्या आदेशानुसार शेततळ्यात आता अस्तरीकरणाचा भागदेखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी कृषी विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीचे निकष लावले जाणार आहेत.

रोजगार हमी योजना विभागाच्या या निर्णयामुळे अस्तरीकरणाच्या कामांबाबत होत असलेल्या खर्चाच्या बाबी कशा व कोणत्या पद्धतीने बसवायच्या याविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. राेहयोमध्ये शेतकरी आधी स्वखर्चातून अस्तरीकरणाचा समावेश केल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होईल. प्लॅस्टिक पेपर टाकल्यामुळे पाणीसाठा जास्त काळ उपलब्ध होतो. उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी अस्तरीकरण महत्त्वाचे असते.

शेततळे अस्तरीकरणाचे आर्थिक मापदंड असे

आकार अकुशल कामे कुशल कामे

३० x ३० x ३ मी २९५८२ १२६५४५

३० x २५ x ३ मी २५६६५ १०९७९१

२५ x २५ x ३ मी २२२४४ ९५१५५

२५ x २० x ३ मी १८८२३ ८०५१९

२० x २० x ३ मी १५६२० ६६८१७

२० x १५ x ३ मी ११९७४ ५१२२२

१५ x १५ x ३ मी १०७१५ ४५८३६

१० x १० x ३ मी ६७७४ २८९८०

रोहयोमध्ये शेततळ्यासाठी आतापर्यंत केवळ अकुलशल कामाचे म्हणजे मजुरीचे अनुदान मिळत होते. नवीन शासन निर्णयानुसार शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी कुशल अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवीन मंजूर होणाऱ्या कामांना याचा लाभ मिळेल.