धुळे : केंद्राने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या़ त्यात व्यापाºयांच्या दृष्टीने निराशाजनक तर शेतकºयांच्या दृष्टीने फायद्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे़शेतकºयांसाठी फायद्याचाशेती वापर करता १५ लाख कृषी पंपाना सौर उर्जा देणे, हा निर्णय चांगला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडुन कृषी उड्डाण योजना शेतमालाची निर्यात करण्यासाठी चांगली. परंतु वाहतुक किती शेतमालाची होईल यावर शेतकºयांचा फायदा अवलंबुन आहे.- अॅड़ प्रकाश पाटील, कृषीभूषणशेतकºयांना न्याय देणाराभारत हा कृषिप्रधान देश असल्याने मोदी सरकारने शेतकºयांना केंद्रबिंदू ठेऊन शेतकºयांना न्याय देणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला़ याशिवाय अर्थसंकल्पामध्ये सर्वांचा विचार करुन करप्रणाली मध्ये बदल केला आहे़ त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला फायद्याचा असा अर्थसंकल्प आहे़ शेतकºयांसाठी १५ लाख कोटी तरतूद करण्यात आली असून सौर ऊर्जा पंप, सिंचन प्रकल्पासाठी भरीव अशी तरतूद बजेट मध्ये आहे़ याशिवाय आरोग्य विभागासाठी ६९ हजार कोटी तरतूद केली असून यातून गरिबांना उपचारासाठी मोठा लाभ होणार आहे़ अतिशय अभ्यासू आणि दूरदृष्टीने मांडलेला हा अर्थसंकल्प आहे़- जयकुमार रावल, माजी मंत्रीसमाधानकारक अर्थसंकल्पशेतकºयांसाठी शेतातील विहीरीसाठी सोलर पंपाची वाढ आरोग्यासाठी आयुष्यमान योजनेत बरीच मोठ्या प्रमाणात तरतुद उदयोगासाठी बँकाना ३ लक्ष ५० हजार रुपयांचे तरतुद म्हणजे सर्वसामान्य पासुन मोठ्या उद्योगापर्यंत सर्वांना सामावुन घेतल्यामुळे अत्यंत समाधानकारक अर्थसंकल्प आहे़- ज्ञानेश्वर भामरेमहागाई नियंत्रणात येईलअडीच लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही़ हा सर्व सामान्य माणसाला मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे़ ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेले पाऊल असुन त्यादुष्टीने कृषी सिंचनासाठी भरीव तरतूद, शेतकºयांसाठी कर्ज मर्यादेत वाढ केली आहे़- अमित दुसाने, वकीलकरदात्यांना दिलासाआज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात उत्पन्नावर कर आकारणी करण्यासाठी नवीन दरांची घोषणा करण्यात आली. यानुसार वैयक्तिक करदात्यांसाठी आता ५ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. त्यानंतर करपात्र उत्पन्नानुसार कराचे दर कमी करण्यात आले आहे. ही कर प्रणाली ज्यांना फायदेशीर आहे त्यांना घेता येणार आहे. मात्र ज्यांना विविध सुटीची वजावट घ्यावयाची आहे त्यांनी प्रचलित करदाराने कर भरला तरी चालणार आहे. तसेच कंपन्यांना देय असलेला डिव्हीडंड टॅक्स ही आता द्यावा लागणार नाही़ करदात्यांचा कोणताही छळ होणार नाही असेही नमूद करण्यात आले. तसेच बँकेतील ठेवींवर सध्या असलेल्या १ लाख रु.पर्यंतच्या संरक्षणाची मर्यादा वाढवुन दिली आहे.-राजाराम कुलकर्णी, सीएव्यापाºयांसाठी निराशाजनकलहान व्यापाºयांसाठी यंदाच्या अर्थसंकल्प हा निराशाजनक आहे़ डिजिटल व्यवहारांवर ३ टक्के कर लावण्यात आल्यामुळे व्यवहार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पुढे येतील का, असा प्रश्न आहे़ व्यापाºयावर त्याचा परिणाम शक्य आहे़ व्यापाºयाला स्कोप राहणार नाही़ जीएसटीची मर्यादा १ कोटी रुपयांपर्यंत वाढवून द्यायला हवी होती़ अर्थसंकल्प निराशाजनक असा आहे़ अर्थसंकल्प निराशाजनक असा आहे़- सुभाष कोटेचा, व्यापारीसमाधानकारक असा अर्थसंकल्पकेंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प हा समतोल साधणारा आहे़ एकप्रकारे लहान खिशातून मोठ्या खिशात पैसा जाणार आहे़ सर्वसामान्य नागरिकांसाठी यंदाचा अर्थसंकल्प हा समाधानकारक ठरलेला आहे़ कर प्रणाली वाढवून दिल्यामुळे सर्वसामान्य आता खर्च करण्यासाठी पुढे येतील़ एकप्रकारे दडलेला पैसा चलनात येईल़- संजय देसले, बिल्डर्सव्यवहाराला चालना मिळेल, अशी अपेक्षाकेंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्यांसाठी फायद्याचा ठरलेला आहे़ सर्वाधिक बेनिफिट त्यांना मिळणार आहे़ लोकांकडे असलेला पैसा आता पुर्णपणे व्यवहारात येईल, असा अंदाज आहे़- अविनाश लोखंडे, वाहन विक्रेतेसंमिश्र अर्थसंकल्पचअर्थसंकल्प हा स्वप्नातील नवभारत निर्माणच्या दिशेकडे जाणारा व आकांक्षाक्षील आहे. सर्व क्षेत्रात देशाची प्रगती व्हावी असा दृष्टिकोण यात दिसतो. उदाहरणार्थ १०० स्मार्ट सिटी, १०० नवीन एयरपोर्ट, नवीन हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था उभारणी तर सोबत सौर ऊर्जाला ही खुप महत्व दिलेले आहे़ बँकींगच्या दृष्टिकोणातून बघितले तर ठेवी सुरक्षितता वाढविलेली आहे, हे एक चांगले पाऊल आहे. मात्र, आयकरमध्ये जे कर दरात जे बदल केलेले आहे ते खूप चांगले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण नवीन कर रचने मधे बचतीला प्रोत्साहन नाही. मुळात भारत हा बचतीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते आपले बलस्थान ही आहे. या बाबीचा विचार वित्त मंत्र्यांनी करावा अशी अपेक्षा़- कैलास जैन, हस्ती बँक
शेतकऱ्यांसाठी फायद्याचा तर व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 21:54 IST