शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:24 IST

१ ते ३१ जुलैदरम्यान मोहीम ; जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींना सूचना

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींचा समावेश धुळे महापालिकेत झाला आहे़  यामुळे तालुक्यात सद्य:स्थितीत १३१ ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक हजार ९१ प्रमाणे एकूण १ लाख ४२ हजार ९२१ वृक्षांची लागवड करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे़  तसेच साक्री तालुक्यातील १६९ ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण १ लाख ८४ हजार ३७९, शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतींना १ लाख ३४ हजार १९३ आणि शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींना एक लाख २८ हजार १३८ वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  राज्य शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा शासनाचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर  शासनाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत  विभागासह जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींनादेखील वृक्ष लागवडीबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायतीअंतर्गत ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ही मोहीम १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. लोकसंख्या वाढीमुळे बेसुमार वृक्षतोड होत आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत असून तापमानातही वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठरविले आहे. तर सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्याचा शासनाचा मानस आहे़  शासनाच्या या उपक्रमात धुळे जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचादेखील समावेश राहणार आहे़ यावर्षी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. ५४१ ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण  पाच लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड केली जाणार आहे़ उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाला सूचना जागतिक तापमानात होणारी वाढ, हवामानात होणारे बदल, यामुळे पडणारा कमी-अधिक पाऊस आणि विविध भागात निर्माण होणारा ओला व कोरडा दुष्काळ या गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासनाचे विविध विभाग आणि जनतेच्या लोकसभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  शासनाने आतापासूनच कंबर कसली असून त्यासंदर्भात जिल्हा पातळीवरील प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात करावयाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकूण ५ लाख ९० हजार २३१ वृक्षांची लागवड करायची आहे़ या सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक हजार ९१ इतके वृक्ष लावायच्या सूचना देण्यात आल्या आहेत़  तसेच त्यापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यास प्रोत्साहित करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासदेखील ८ हजार ३८० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायत विभागाकडे वृक्ष लागवडीसाठी जागा शिल्लक नसल्याने या विभागाला दिलेला लक्ष्यांक तालुकानिहाय ठरवून देण्यात आला आहे़  त्यानुसार जिल्ह्यातील चारही तालुक्यात प्रत्येकी २ हजार १०० वृक्ष लागवड केली जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात वृक्ष लागवड झाली होती. परंतु, वृक्ष लागवड मोहीम राबविल्यानंतर लागवड केलेल्या वृक्षांकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे वृक्षांचे नुकसान झाले. त्यामुळे वृक्ष लागवड मोहीम राबविताना वृक्षारोपण झाल्यानंतर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असा सूर पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेgram panchayatग्राम पंचायत