शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मोफत पास द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 21:48 IST

महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विभागीय कार्यालयासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळावेत या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज विभाग नियंत्रक कार्यालयासमोर निदर्शने करून, विभाग नियंत्रकांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी धुळे जिल्ह्यात दुष्काळ पडला असून, शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. राज्यशासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना नि:शुल्क पासची व्यवस्था केलेली आहे.  जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येत असतात. प्रवासासाठी ते बसचा वापर करतात.  दरम्यान शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पासची व्यवस्था केलेली असली तरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोफत पास मिळालेले नाहीत. पाससाठी विद्यार्थ्यांना एस.टी. आगारात ताटकळत उभे राहावे लागते.आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की, महामंडळात पाससाठी चकरा माराव्यात? त्यामुळे विद्यार्थ्यांना मोफत पास त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. यावेळी महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, यश शर्मा,गणेश पवार, गणेश चव्हाण, राहूल मराठे, महेश सूर्यवंशी, पंकज नेरकर,नयन पाटील, भाविक घरटे, नयन बाविस्कर उपस्थित होते.मोराणे येथील थांब्यावरच बस थांबवावीमोराणे येथील समता शिक्षण संस्था संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही विभाग नियंत्रकांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, साक्री-धुळे रस्त्याचे काम सुरू आहे. विद्यार्थी नेहमीच्या थांब्यावर थांबतात,मात्र महामंडळाची बस वेगळ्याच ठिकाणी थांबत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास अडचण येते. मोराणे गावाच्या थांब्यावरच बसथांबा किंवा बस थांबवा अशी पाटी महामंडळातर्फे लावण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे