लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचानजिक मांडळ रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा वाहून नेणाºया वाहनाला शनिवारी सायंकाळी पकडले़ १ लाख ७७ हजाराचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे़ दोंडाईचा पोलिसात नोंद झाली आहे़ दोंडाईचाकडून मांडळ गावाकडे जाणारी एमएच १८ डब्ल्यू ८७५६ क्रमांकाचे वाहनावर संशय आल्याने ते वाहन थांबविण्यात आले़ चालकाकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची तपासणी केली असता गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या़ वाहनासह मुद्देमाल जप्त केला असून चालक जितू राजाराम मिस्तरी या संशयिताला अटक झाली़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, मायुस सोनवणे, तुषार पारधी, विशाल पाटील या पोलीस कर्मचाºयांनी केली़
एलसीबीने पकडला दीड लाखांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:58 IST
मांडळनजिक घटना : एकास अटक
एलसीबीने पकडला दीड लाखांचा गुटखा
ठळक मुद्देमांडळ रोडवर एलसीबीची धाडगुटख्याचा साठा जप्त