शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील गजानन कॉलनीला ‘छावणी’चे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:39 IST

तणावपूर्ण शांतता : पोलीस चौकीची जागा लवकरच बदलणार, बंदोबस्त कायम

ठळक मुद्देघटनेचे गांभिर्य लक्षात घेता परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे पोलिसांच्या मदतीला बाहेरुन देखील बंदोबस्त तात्काळ मागविण्यात आला होता़त्यात जळगाव येथून २ अधिकारी ५० कर्मचारी, नंदूरबार येथून ४ अधिकारी ४३ कर्मचारी, नाशिक ग्रामीणमधून २ अधिकारी ४० कर्मचारी आणि याशिवाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ मधील एक तुकडी लगोलग दाखल झाली़ त्यांनी सुरुवातीला घटनास्थळी निर्माण होत असलेली गर्दी पांगव या भागातील तणावाची स्थिती शांत करण्याचा प्रयत्नही केला़ सध्या या भागात शांतता असलीतरी तणाव कायम आहे़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे : शहरातील गजानन कॉलनी, अरिहंत मंगल कार्यालय परिसरात बुधवारी रात्री दोन समुदायात तणाव निर्माण होऊन दगडफेकीची घटना घडली होती़ परिस्थिती नियंत्रणात असलीतरी तणाव कायम आहे़ परिणामी पोलिसांचा बंदोबस्त या भागात कायम ठेवण्यात आलेला आहे़ दरम्यान, या भागातील पोलीस चौकीचे स्थलांतर तणावग्रस्त भागात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत़ घटनास्थळी दगडांचा खचशहरातील ८० फुटी रोडवरील अरिहंत मंगल कार्यालय, गजानन कॉलनी भागात किरकोळ कारणावरुन दोन समुदायात दंगल उसळली़ काय होत आहे, हे समजण्याच्या आत एकमेकांवर दगड भिरकाविण्यात आल्यामुळे परिस्थिती देखील गंभीर झाली होती़ आरडा-ओरड होत असताना घोषणाबाजीही करण्यात आल्याने अधिकच तणाव वाढला होता़ घटनास्थळी दगडांचा खच पडलेला होता़ घटनास्थळी तातडीने पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी पोलीस फौजफाट्यासह दाखल झाला होता़ सोशल मिडीयावर ‘वॉच’!घटनेचे गांभिर्य लक्षात घेता अफवा कोणीही पसरु नये़ यासाठी सोशल मिडीयावर पोलिसांची नजर आहे़ याकामी सायबर सेल सतर्क असून घटनेवर आणि सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे़ कोणी अफवा पसरविताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिला आहे़ वरिष्ठांची घटनास्थळी भेटनाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी तातडीने गुरुवारी सकाळी धुळ्यात येवून घटनास्थळी भेट दिली होती़ त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात येवून त्यांनी पोलीस अधिकाºयांना मार्गदर्शक सूचनाही केल्या़ नव्याने पोलीस चौकीनागरिकांना संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याकडे केली होती़ पोलीस चौकी या ठिकाणी असलीतरी ती लांब आहे़ म्हणून ज्या ठिकाणी तणाव कायम असतो त्याच जागेवर चौकी नव्याने उभारण्यात येणार असल्याचे सुतोवाच देण्यात आले आहे़ त्यामुळे या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत़