शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:34 IST

विधानसभा निवडणूक : धुळ्याच्या सभेत शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे आश्वासन

धुळे : विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार आहे़ विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत़ धुळ्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकही पैसा कमी पडू दिला जाणार नाही़ धुळेकरांना रोज पिण्याचे पाणी कसे दिले जाईल याचे नियोजन करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव  ठाकरे यांनी धुळ्यातील सभेत दिले़ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे धुळ्यातील गोंदूर विमान तळावर दुपारी १२ वाजून २२ मिनीटांनी आगमन झाले़ यावेळी माजी मंत्री डॉ़ सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भूसे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी, हेमंत साळुंखे, भाजपचे मनोहर भदाणे, अतुल सोनवणे, संजय गुजराथी, अ‍ॅड़ पंकज गोरे, रविंद्र काकड, राजेंद्र पाटील, गुलाब माळी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ या पदाधिकाºयांनी उध्दव ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले़ यानंतर लगेच ठाकरे हे विशेष हेलिकॉप्टरने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील सभेकडे रवाना झाले़ त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते़ धडगाव येथील सभा आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुन्हा गोंदूर विमानतळावर दाखल झाले़ आणि धुळे शहरातील महायुतीचे उमेदवार हिलाल माळी यांच्या उमेदवारी प्रचारार्थ क्युमाईन क्लब समोरील जागेवर सभास्थळी उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले़ त्यावेळी सभेत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले़ उध्दव ठाकरे म्हणाले, केवळ विकासाच्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत़ सध्यस्थितीत विरोधकच राहिला नसल्याचे चित्र राज्यात सर्वदूर दिसत आहे़ तुमच्या हक्काचा आमदार आणि राज्यात सरकार असणार आहे़ शरद पवार हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणतात़ तुम्ही स्वस्थ बसूच नका़ कारण हे सरकार पडणार नाही असा विश्वास आहे़ नागरीकांना आरोग्याच्या सुविधा नाममात्र दरात दिल्या जातील़ केंद्रात आपले सरकार आहे, तर राज्यात देखील आपलेच सरकार येऊ द्या़ ते म्हणाले, आम्ही धुळे ग्रामीणमध्ये दिलखुलास मदत करत आहोत़ तर, धुळे शहरात देखील दिलखुलास मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली़ 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक