सामोडे ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र गांगेश्वर मंदिराकडे जाणारा जेमतेम पाच-सहा फूट रुंदीचा लांबलचक एकेरी रस्ता चारचाकी वाहनांसाठी अत्यंत धोकादायक असल्याने, केव्हा येथे वाहन नाल्यात जाऊन दुर्घटना घडेल हे सांगता येत नाही. एका बाजूने वाहन जात असेल आणि त्याच प्रसंगी दुसऱ्या बाजूने वाहन आले तर पाच-सहा फूट रस्त्याने दोन्ही वाहने एकमेकांना ओलांडूच शकत नाहीत. मात्र यासाठी या पुढारलेल्या गावातील ग्रामपंचायत व लोकांनी पुढाकार घेऊन तत्काळ हा जीवघेणा रस्ता रुंद करण्यासाठी पुढे यावे व मार्ग काढावा, अशी मागणी परिसरातील दोनशे ते तीनशे उपस्थित भाविकांनी केली आहे.
यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि भविष्यातील दुर्घटना घडू नये आणि जागृत देवस्थान आणि आपली देवावरील श्रद्धा या गोष्टींचा विचार करून, गावातील एखादे विकासकाम झाले नाही तरी चालेल; मात्र या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी बेहेड येथील संजय तोरवणे, दीपक तोरवणे, अरुण मराठे, दिनेश पाटील, यशवंत पाटील, सागर देसले, विष्णू साबळे, राजू गायकवाड, श्रीराम सूळ, भिका नाईक, दीपक मासुळे, आदी उपस्थित भाविकांनी केली आहे.