शुक्रवारी २४४ रूग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 10:46 PM2020-09-04T22:46:26+5:302020-09-04T22:47:04+5:30

जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९४४८ इतकी

Friday 244 patients positive | शुक्रवारी २४४ रूग्ण पॉझिटिव्ह

dhule

Next

धुळे : जिल्ह्यातील आणखी २४४ रूग्णांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले. तसेच पाच रूग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ९४४८ इतकी झाली आहे.
मृतांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे धुळे शहरातील मोहाडी येथील ६७वर्षीय पुरुष, मोगलाईमधील ६२ वर्षीय महिला, शिरपूर तालुक्यातील पिळोदा येथील ५९ वर्षीय पुरुष आणि शिंदखेडा धांदरणे येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणारे ४८ वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाला आहे.शहरातील १४८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यत धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे.जिल्हा रुग्णालय - येथील १७२ अहवालांपैकी २८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गोळीबार टेकडी १, फागणे १, गल्ली नंबर चार १, जगन्नाथ नगर देवपूर २, पवन नगर २, जगदंबा सोसायटी साक्री रोड १, जय हिंद कॉलनी ५, धुळे इतर १, मनोहर टॉकीज जवळ १, रानमळा १, आमदड १, कुमार नगर १, कापडणे २, नगाव १, चौगाव १, आर्वी १, उडाने १, शिंदखेडा १, बोरकुंड १, जुन्नर १,उत्कर्ष कॉलनी १.
दोंडाईचा - १६ अहवालांपैकी ४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात होळ २, भदाणे १, रावळ नगर दोंडाईचा १. उपजिल्हा रुग्णालय मधील रॅपिड अँटीजन टेस्ट च्या १४ अहवालांपैकी ६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात डालडा घरकुल १, नवा भोईवाडा १, विद्यानगर ३, दोंडाईचा १.
शिरपूर- १५० अहवालांपैकी २७ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. त्यात हिसाळे १, गरताड १, पिळोदा १, जवखेडा १, अर्थे १, शिंगावे १, तºहाडी १, विद्याविहार १, वरवाडे १ आणि शिरपूर इतर १८.
भाडणे - ७९ अहवालांपैकी १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गांधी चौक दुसाने १, पी एच सी दुसाने १, बस स्टॉप जवळ कासारे १, देऊर बुद्रुक २, निजामपूर पी एस सी १, निजामपूर १, शिवाजी चौक छडवेल कोर्डे १, राणाप्रताप चौक साक्री १,जैताणे पी एस सी जवळ ३, आदर्श नगर साक्री १.
मनपा पॉलिकेक्निक - मधील १२५ अहवालांपैकी ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मालेगाव रोड १, स्टेशन रोड १, अनमोल नगर १, नकाणे रोड २, एकता नगर बिलाडी रोड १, साक्री १, कुमार नगर १, संभाप्पा कॉलनी ४, जितेंद्रनगर १, साईबाबा मंदिर १, मोराणे १, देठणकर नगर २, जे बी कॉलनी १, इंदिरा हौसिंग सोसायटी १, तुळशीराम नगर २, साक्री रोड ३, जुने धुळे २, बोरसे नगर २, एकता नगर १, मातोश्री नगर १, धुळे इतर १, वाडीभोकर रोड १, वानखेडकर नगर १, एकविरा चौक १, सत्यसाईबाबा कॉलनी १. मनपा पॉलिटेक्निक मधील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २८१ अहवालापैकी २९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात चाळीसगाव रोड १, श्रीकृष्ण कॉलनी ३, मातोश्री नगर २, सुभाष नगर ४, नवनाथ नगर १, बिलाडी रोड सैनिक कॉलनी १, एकता नगर २, नगावबारी २, सप्तशृंगी कॉलनी १, एच आर सी ,धुळे १, जुने धुळे २, जेल परिसर २, कॉटन मार्केट धुळे १, विघ्नहर्ता कॉलनी १ श्रीराम कॉलनी १, सोन्या मारुती कॉलनी १, मोहाडी १, धुळे १, वरखेडी १.
वैद्यकीय महाविद्यालय - येथील २२ अहवालांपैकी ७ अहवाल धुळे इतर ५, साक्री १, शिरपूर १.आदी.

Web Title: Friday 244 patients positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे