धुळे : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया चौघांना धुळे तालुका पोलिसांच्या गस्ती पथकाने धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारातून रंगेहात पकडले़ ही घटना रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली़ यातील एक जण मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे़ गेल्या काही दिवसांपासून चोºया आणि घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे़ या अनुषंगाने रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्राप्त झाल्याने शहरासह जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा पुरती कामाला लागली आहे़ धुळे तालुका पोलीस ठाण्याचे रात्रीचे गस्ती पथक नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर फिरत होते़ धुळे तालुक्यातील कुंडाणे वार या भागात असताना काही तरुण संशयितरित्या फिरत असल्याचे लक्षात आले़ त्यांना थांबविण्यात येऊन त्यांची चौकशी करण्यात आली़ ही घटना रविवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली़ दरोड घालण्याची त्यांची तयारी असल्याचा संशय घेऊन त्यांच्याकडील असलेल्या साहित्याची तपासणी केली असता लोखंडी टॅमी, सळई, चाकू, लाकडी दांडा, दोरखंड, मिरचीची पूड आणि विना नंबरची दुचाकी त्यांच्याकडे आढळून आली़ या पाचही जणांना पोलिसांनी संशयावरुन ताब्यात घेतले़ पण, अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला़ या सर्वांना धुळे तालुका पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ पोलीस कर्मचारी सुमीत चव्हाण यांनी रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, चेतन सुनील शेलार (२१), महेश उर्फ महेंद्र रविंद्र पाटील (२१), उमेश शालिंदर वाघ (२०), तुषार दादाभाई वाघ (२०) (सर्व रा़ कुंडाणे (वार) ता़ धुळे) या संशयितांविरुध्द भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ पळून गेलेल्याचा शोध सुरु आहे़ पोलीस उपनिरीक्षक एस़ ए़ भोरकडे घटनेचा तपास करीत आहेत़ या सर्व संशयितांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता २७ नोव्हेंपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
दरोडा टाकण्यापूर्वीच चार दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:40 IST