गावात तीन दिवस जनता कर्फ्यूही पाळण्यात आला. मात्र तरीही गावात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नेर गावात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाने शिरकाव केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनही सुरू झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. व्हायरल इन्फेक्शन आणि कोरोनाची लक्षणे सारखीच असल्याने अनेक जण बरे होण्याची वाट पाहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचीही भीती व्यक्त होत आहे. तर कोरोनाच्या संसर्गात नाका-तोंडावर मुखपट्टी (मास्क) असणे सर्वांत उत्तम उपाय आहे, पण लोक मास्कचा वापर करीत नाहीत, ही खेदजनक बाब असल्याने सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे. यासाठी ग्रामपंचायतीने कडक निर्बंध लादून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून मास्क लावणे सक्तीचे करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नेर येथे एकाच घरातील चार जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST