शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

धुळे पोलिसांकडून साडेचार हजार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 22:17 IST

लॉकडाउनच्या महिन्याभरातील कारवाई : ३४३ जणांविरुध्द थेट गुन्हे दाखल, कारवाईचे सत्र सुरु

धुळे : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले असताना त्याची अंमलबजावणी धुळ्यात प्रभावीपणे केली जात आहे़ संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ३४३ जणांविरुध्द थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये २५ जणांना रितसर अटक करण्यात आली असून विनाकारण फिरणाºया ४ हजार ५३२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवाई करण्याचे सत्र सुरुच आहे़ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आल्यानंतर साहजिकच धुळ्यात देखील त्याची प्रभावीपणे अंमजबजावणी केली जात आहे़ लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेले असतानाच विनाकारण फिरणाऱ्यांना अटकाव करण्याचे धोरण पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्याकडून राबविण्यात आले़ शहरात दुचाकी घेऊन विनाकारण फिरणाºयांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची दुचाकी जप्त करण्याच्या सूचना अधीक्षकांकडून देण्यात आल्या़ त्यासाठी शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये त्या त्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांना तैनात करण्यात आले़ त्यानुसार, शहरातील सातही पोलीस स्टेशनअंतर्गत २ हजार ५६९ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून ६ लाख ९४ हजार १०० रुपये दंड वसूल झाला आहे़ तर, शहर वाहतूक शाखेतंर्गत १ हजार ९६३ दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून ४ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केलेला आहे़ असे एकूण धुळे शहरातील सात पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून ४ हजार ५३२ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून त्यांच्याकडून १० लाख ९७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़अजूनही ठिकठिकाणी विनाकारण दुचाकी घेऊन शहरात फिरणारे दिसून येत आहेत़ त्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे़ कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी प्रयत्न सुरु आहेत़ घरीच थांबा, सुरक्षित रहा असे आवाहन देखील करण्यात येत असताना प्रतिसादाची गरज आहे़कारवाई सुरुच राहणाऱ़़शहरात लॉकडाउन काळात विनाकारण फिरणाºयांना मज्जाव करण्यात येत असताना तरी देखील नियमांचे उल्लंघन केले जात आहेत़ नियमांचे उल्लंघन करणाºया शहरातील ३४३ जणांविरुध्द शहरातील विविध पोलीस ठण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ २५ जणांना अटक देखील करण्यात आली आहे़ अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याचे अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे