शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

वर्षअखेर आढळले २७६ एड्सबाधित रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:39 IST

एचआयव्हीतून सावरतोय जिल्हा । १९ वर्षात १२ हजांर एड्सबाधितांवर उपचार; रूग्णांवर एआरटी केंद्रातून समुपदेश व उपचार

ठळक मुद्दे३५ गावामध्ये सर्वाधिक बाधितसन २००० पासून एड्स बाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचारदरवर्षी ११ हजार रूग्णांची तपासणी१९ वर्षात १ लाख २२ हजार ४२८ पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी११ आरोग्य केंद्रातून रुग्णांवर मोफत उपचारयंदा आॅक्टोंबरअखेर २७४ एड्स रुग्ण

चंद्रकांत सोनार ।धुळे : एक जीवघेना रोग असलेला एड्स रूग्णांची संख्या १३ वर्षापूर्वी जिल्हात चिंताजनक होती़ शासनाने एड्स नियंत्रणासाठी गांभीर्याने लक्ष दिल्याने आता एड्स आजारापासून आपला जिल्हा सावरला आहे़ १९ वर्षाच्या आकडेवारीनुसार यंदा आॅक्टोंबरअखेर २७४ एड्स रुग्ण आढळून आले आहे़देशात एचआयव्ही एड्स संसर्गित लोक साधारणपणे २५ लाखांपेक्षा अधिक आहे. देशात दर शंभर एचआयव्ही संसर्गित रुग्णांमध्ये ६१ पुरूष आणि ३९ महिला असतात. या आकडेवारीनुसार एडस बाधितांमध्ये पुरूषांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट होते. येथील आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १९ वर्षात २००० मध्ये बाधितांची टक्केवारी १३.१७ होती़ त्यानंतर बाधितांचे प्रमाण वाढून २००७ मध्ये ३१.६४ पर्यत पोहचले होते़ आरोग्य विभागाकडून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम यावेळी राबविण्यात आली़ त्याचा परिणाम २०१० मध्ये १४.८५ टक्यावरुन २०१८ मध्ये बाधितांची संख्या २.४६ टक्केपर्यंत आटोक्यात आली. तर २०१९ जुनपर्यत एड्स बाधितांचा आकडा १.६८ पर्यत आणण्यात आला आहे़यंदाची आकडेवारीशहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविदयालयात एड्सबाधितावर समुपदेशन, तपासणी व उपचार केले जातात़ २००६ ते आॅक्टोबर २०१९ या कालावधीत १० हजार १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती़ त्यात ४ हजार ४९६ रुग्ण एड्सबाधित आढळले़ त्यात २१३ बालकांचा समावेश होता़५५ हजार ८०९ रुग्ण तपासणीयावर्षी आॅक्टोबरअखेर ५५ हजार ८०९ रुग्णांची तपासणी झाली होती़ त्यात २७४ रुग्ण बाधित आढळून आले आहे़ त्यात १३१ गरोधर मातांना समावेश आहे़ रुग्णांवर हिरे वैद्यकीय महाविद्यालय, शिरपूर शासकीय रुग्णालय तसेच ११ आरोग्य केंद्रातून रुग्णांवर मोफत उपचार केले जातात़जिल्ह्यात एड्स नियंत्रणासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ नागसेन रामराजे यांच्या मार्गदर्शनात एआरटी केंद्राच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ़शिल्पा राव, डॉ़ शिल्पा पवार, डॉ़ जे़पी़ पाटील यांच्यासह पर्यवेक्षक, प्रयोग शाळा तंज्ञ असे १३ कर्मचारी परिश्रम घेत आहेत़३५ गावामध्ये सर्वाधिक बाधित1 गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या धुळे जिल्ह्यात ३५ गावांमध्ये एड्स बाधित रूग्णांची संख्या सर्वाधिक आढळून येते़ स्थालांतर व विवाहबाह्य संबधांत सुरक्षा न घेतल्याने महिलांसह पुरूषांमध्ये एड्स आढळून येतो़दरवर्षी ११०० रूग्णांची तपासणी2 जिल्हा रूग्णालयासह शिरपूर ग्रामीण रुग्णालय अशा दोन केंद्रात एड्स बाधित रुग्णांवर मोफत उपचार केला जातो़ दरवर्षी ११ हजार रूग्णांची तपासणी हिरे महाविद्यालयातून करून त्यात निष्पन्न झालेल्या रूग्णांवर उपचार केले जात आहे़दीड लाख रूग्णांची तपासणी3 भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात सन २००० पासून एड्स बाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे़ त्यात आतापर्यत १९ वर्षात १ लाख २२ हजार ४२८ पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे़राज्यभरातील रूग्णावर उपचार4 जिल्ह्यासह मालेगाव, झोडगे, चाळीसगाव, भडगाव, कन्नड, नंदूरबार जळगाव अशा जिल्हयातील रूग्ण उपचार घेत आहे़ तर शिरपूर येथे मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील रूग्ण उपचार घेतात़

टॅग्स :Dhuleधुळे