कोरोना काळात तसेच नेहमी तत्पर राहून जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल बेजबाबदार माजी आमदार अनिल गोटे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि घोषणाबाजी करत आमदार फारूक शाह तीव्र शब्दात निषेध नोंदविला. यावेळी आमदार शाह यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस बॉईज संघटनेने जाहीर निषेध आंदोलनात सहभाग घेत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
खासदार शरद पवार यांची दोंडाईचा येथे सभा होणार आहे. या सभेला पोलिस कर्मचाऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बेजबाबदार माजी आमदार अनिल गोटे यांना व्यासपीठावर बसविणार की महाराष्ट्र पोलिसांच्या बाजूने उभे राहणार? साऱ्या खान्देशाचे लक्ष आपल्याकडे लागून आहे. अशी माहिती आमदार फारूख शाह यांचे स्वीय सहाय्यक निलेश काटे यांनी दिली.