शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

रॅपिड रिस्पॉन्स पथके गठित करा, कन्टेन्मेन्ट झोनची कठोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही गंभीर बाब असून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर प्रत्येक ...

धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही गंभीर बाब असून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या धर्तीवर प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात यावे. चाचण्यांची संख्या वाढवावी. गृहविलगीकरणातील बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करीत विनामास्क फिरणाऱ्या प्रत्येकाला दंड ठोठावून त्यांची चाचणी करावी, रॅपिड रिस्पॉन्स पथके गठित करावीत. कन्टेन्मेन्ट झोनची कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात गुरुवारी दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, सुरेखा चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांबरोबरच पॉझिटिव्हीटी दरही वाढला आहे. याची दखल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. त्यांच्या निर्देशानुसार आता उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे कन्टेन्मेन्ट झोनची कठोरपणे अंमलबजावणी करावी, विनामास्क फिरणाऱ्यांवर संयुक्तपणे कारवाई करावी, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करावेत, तेथे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, विवाह सोहळ्यांत निर्धारित संख्येपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. फिव्हर क्लिनिक कार्यान्वित करून त्यांची संख्या वाढवावी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात निरीक्षक नियुक्त करून दररोज अहवाल सादर करावा, याशिवाय नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांना सूचना देत निगराणीखाली ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.