आॅनलाइन लोकमतधुळे :जिल्ह्यातील ओला दुष्काळग्रस्त व पुरबाधित विद्यार्थ्यांची सन २०१९-२० व २०२० -२१ ची शैक्षणिक फी तसेच परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पीके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळीराजा अडचणीत सापडलेला आहे. धुळे जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापूरामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेले आहेत. ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित भागातील हजारो विद्यार्थी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकत आहे. याचबरोबर दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेले आहे.नुकसान झाल्याने अनेक विद्यार्थी बोर्डाचे परीक्षा शुल्क भरू शकत नाही. बोर्डाचे परीक्षा शुल्क भरता न आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. अशीवेळ कुठल्याही विद्यार्थ्यावर येऊ नये. याबाबत तातडीने विचार करून जिल्ह्यातील ओला दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांचे २०१९-२० तसेच २०१०-२१ या वर्षातील शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय घेण्यात यावा. तसेच संलग्न शाळा व महाविद्यालयांनी कोणतेही शुल्क न आकारता प्रवेश द्यावा अशी मागणी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्यावीतने करण्यात आलेली आहे. याबाबत योग्य कार्यवाही करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी केलेली आहे. निवेदनावर दिलीप पाटील, अशपाक खाटीक, एन.एन. महाले, किरण मासुळे, संजय पाटील, विजय सूर्यवंशी, रणजित शिंदे, राजेंद्र पाटील, वंदना हालोरे, कानिफनाथ सूर्यवंशी, हर्षल पवार आदींच्या स्वाक्षºया आहेत.
धुळे जिल्ह्यातील ओला दुष्काळ भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:54 IST