शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दिलेला शब्द पाळून धुळे शहराचे सर्व प्रश्न सोडवू   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 14:21 IST

महापालिका निवडणुकीतील विजयानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया

ठळक मुद्देधुळे महापालिकेत पक्षाला बहुमत, ५० जागा पटकावल्याधुळेकर जनतेचे मानले आभार, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त धुळे शहरातील सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला ५० जागांवर विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे ५० किंवा त्यापेक्षा अधिक जागांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात धुळेकर जनतेचा विश्वास मोलाचा ठरला. एकहाती बहुमत दिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळून शहराचे सर्व प्रश्न सोडवू, अशी प्रतिक्रिया पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे बोलताना दिली. जनतेने हा विजय बहाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तो आम्ही सार्थ ठरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकर अनेकांच्या दादागिरी, गुंडगिरीमुळे दबावात होते. तो त्यांनी यावेळी झुगारून दिला. येथील वाहतूक, हॉकर्स, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, भुयारी गटार असे अनेक प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही देत पक्षाला या निवडणुकीत बहुमत देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी येथील जाहीर सभेत केले होते. येथील जनतेने त्यावर विश्वास व्यक्त केल्याचे या निकालातून दिसत आहे. पक्षाचे येथील आमदार अनिल गोटे यांनी अनेक नाटके केली. पण त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना भुईसपाट केले. त्यांनी ते मान्य करावे. त्यांच्या पक्षाला एक जागा मिळाली, ती तरी कशी मिळाली याचे आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले. पक्षाला ५० पेक्षा अधिक जागा निश्चितपणे मिळाल्या असत्या. परंतु माझे गणित थोडे चुकले. माझ्या मतदारसंघात शेंदुर्णी येथेही नगरपंचायतीची निवडणूक असल्याने तिकडे लक्ष द्यावे लागले. त्यामुळे  येथे थोडे प्रयत्न कमी पडले. परंतु तरीही जनतेने भरभरून मतदान करून पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही धुळेकरांना दिलेला शब्द पाळणार असून शहरातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार अनिल गोटे यांच्याबद्दल ते म्हणाले की, त्यांनी आपली भाषा सुधारावी. आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान त्यांनी बाळगले पाहिजे. त्यांच्यासंदर्भात निर्णय घेण्याइतका मी मोठा नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 

 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक