शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

लोककला,नाट्य कलेची प्रेरणा आजोबांकडूनच मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:18 IST

हौशी नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांची कृतज्ञता : नाटकाने बोलणे, जगणे शिकविले

अतुल जोशी।आॅनलाइन लोकमतधुळे : घरी शेतीवाडी अथवा नोकरीचे कुठले साधन नसल्याने, आजोबा गोंधळ, लोककला सादरीकरण करण्याचे काम करायचे. त्यांच्यामुळे लोककलेची आवड निर्माण झाली. महाविद्यालयात असतांना एकांकिका केल्या. पुढे नाट्यक्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटविला. मात्र यासर्व प्रवासात आजोबा दगडू लक्ष्मण पाचंगे (गोंधळी) हेच आपले गुरू असल्याची भावना हौशी नाट्यकर्मी संदीप पाचंगे यांनी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली.नाट्यकर्मी संदीप पाचंगे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे रहिवाशी. घरी शेती अथवा कोणी नोकरीला नसल्याने, परिवाराचा उदरनिर्वाह म्हणून आजोबा दगडू गोंधळी हे गावोगावी गोंधळ, लोककला सादर करण्याचे काम करायचे. त्यातूनच मुलांचे शिक्षण केले. घरीच लोककला सादरीकरणाची परंपरा असल्याने, संदीप पाचंगे यांनीही लोककलेविषयी आवड निर्माण झाली. लोककलेचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले. वयाच्या १०-१२ व्या वर्षापासून ते लोककलांच्या कार्यक्रमांमधून तुनतुना वाजवायला शिकले. संभळ कसा वाजवायचे याची शिकवण आजोबांनी दिली. पुढे महाविद्यालयात असतांना प्रा. सुधीर साठे, प्रा. अरविंद चौधरी यांनी पाचंगे यांना एका एकांकिकेत संधी दिली. १९९९ मध्ये मू.जे. महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ‘विषाची परीक्षा’ ही एकांकिका सादर केली. या एकांकिकिने त्यांना ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर स्पर्धेविषयी जिव्हाळा वाढला. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर उत्पन्नाचे साधन म्हणून ते पथनाट्याकडे वळले. पथनाट्यात विनोद ढगे हे आपले गुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्वत:चा गृप तयार केला. या पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले. पथनाट्य करीत असतांनाच जळगावातील नाट्यकर्मिंशी संपर्क आला. त्यांच्या माध्यमातून अनेक राज्य नाट्य स्पर्धा केल्या. ज्येष्ठ रंगकर्मीच्या माध्यमातून नाटकांमधील बारकावे शिकण्यास मदत झाली. धुळ्यातही पूर्वी नाट्यक्षेत्राचे काम जोरात होते. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत त्यात शिथिलता आली. इतर नाट्यकर्मींच्या सहकार्याने येतील नाट्यक्षेत्राला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. धुळ्यात २०११ मध्ये महावितरणची स्पर्धा झाली. त्यात ‘एक चॉकलेट प्रेमाचे’ हे नाटक सादर केले. या नाटकाने धुळ्यात ओळख निर्माण झाली. त्यानंतर शहरातील इतर नाट्यकर्मींच्या सहकार्याने ‘आषाढ नाट्य महोत्सव’ सुरू केला. या नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून उत्तराखंडमध्ये आलेल्या प्रलयगस्तांना तसेच बेटावदच्या एका शहीद जवानांच्या परिवाराला मदत केली. नाटकाने मला जगणे, बोलणे शिकविल्याची त्यंची भावना आहे. पाचंगे यांनी आतापर्यंत २२-२३ दोन अंकी नाटकाचे प्रयोग केले आहेत. तर ४० एकांकिका सादर केल्या आहेत. त्याचबरोबर स्वरचित दहा बिडंबन नाटिका सादर केल्या आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे