शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ट्रक-बसचा अपघातात पाच प्रवासी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:28 IST

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला 

ठळक मुद्देदहीवेलपासून एक कि.मी. अंतरावर झाला अपघातपाच प्रवासी जखमी, बसचालकामुळे अनर्थ टळला ट्रकचालकास अटक, गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कदहीवेल, ता.साक्री : बस व ट्रक यांच्यातील अपघातात पाच बस प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावापासून एक कि.मी. अंतरावर नागपूर-सुरत राष्टÑीय महमाार्गावर घडली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. साक्री बस आगाराची वापी-साक्री (क्र.एमएच २० डीएल १६४६) ही बस रोज दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास दहीवेल येथे पोहचते. बुधवारी गावापासून एक कि.मी. अंतरावर असताना दहीवेलकडून सुरतकडे भरधाव जाणारा ट्रक (क्र.जीजे ०४ एडब्ल्यू २२२३) बसवर धडकणार असताना बसचालकाने बस शेजारच्या भरावावर चढविली. मात्र तरीही ट्रक चालकाच्या बाजूने बसला मागे धडकला. त्यामुळे बसचा पत्रा मोठ्या प्रमाणात कापला गेला.  या अपघातामुळे बसमधील दिपाली नितेश मोहिते (१९) रा.नवापूर व ज्योती परशुराम पाटील रा.बलसाड, लहू मोरे (२), सोहम मोरे (६) व मंगल अशोक लष्कर, रा.चक्करबर्डी, धुळे हे पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील दिपाली मोहिते हीच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून तिला धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ज्योती पाटील यांच्याही डोक्याला दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. उर्वरीत तिघांना किरकोळ मुका मार लागला आहे. या प्रकरणी बसचालक प्रकाश शिंदे यांचा जवाब दहीवेल पोलिसांनी घेतला असून ट्रकचालक गोविंद रामजीभाई सोळंके (रा.गुजरात) यास अटक केली. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नागपूर-सुरत राष्टÑीय महामार्गाच्या फागणे ते नवापूर या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम  सध्या सुरू आहे. साईडपट्ट्यांना भरावाचा तसेच दिशादर्शक फलकाचा अभाव आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात