शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरूंकडून पाच गाड्यांची नासधूस

By admin | Updated: April 10, 2017 00:26 IST

शहरात गेल्या आठवड्यात ४ वाहनांच्या काचा फोडल्या होत्या, लोकांमध्ये घबराट

शिरपूर : शहरात गेल्या आठवड्यापासून माथेफिरूंकडून वाहनांच्या काचा फोडण्याचे सत्र  थांबता-थांबेना झाले आहे. रविवारी रात्री १२़३० ते १़३० वाजेच्या सुमारास माथेफिरूने पाच गाड्यांच्या काचा फोडल्या.विशेषत: जळगाववाला-बोहरी यांच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या गाडीच्या काचा पहारेकरीला दम देऊन फोडल्या गेल्या. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या ५ वाहनांच्या काचा माथेफिरूंनी फोडल्या आहेत. सदर माथेफिरू सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे़ यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़९ रोजी रात्री १२़३० ते १़३० वाजेच्या सुमारास या घटना घडल्या आहेत. दलालनगरातील रहिवासी  मुस्तफाभाई जळगाववाला यांनी त्यांच्या बंगल्यात गाडी क्रमांक एमएच १८-एजे-७५५३ लावली होती़ विशेषत: या बंगल्याबाहेर रात्रीच्या वेळी पहारेकरी असतो़ अज्ञात माथेफिरूंनी त्यास दम देऊन कंपाऊंडमध्ये प्रवेश करून गाडीच्या काचा फोडून पसार झालेत़ सदर घटनेत ४०-५० हजारांचे नुकसान झाले आहे़ घटनेचे वृत्त पहारेकरी यांनी डॉ़ तस्नीमबेन जळगाववाला यांना कळविताच त्यांनी लगेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्याशी संपर्क साधून कळवले़, ते ही पोलिस पथकासह लगेच दाखल झालेत़ बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका मोटारसायकलीवर ट्रिपल सीट आलेले माथेफिरू कैद झाले असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस पथक करीत आहे़यानंतर माथेफिरूंनी सुभाष कॉलनीतील २ तर काझीनगरातील २ असे वाहनांच्यादेखील काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली़ गेल्या आठवड्यातच दलालनगरातील रहिवासी भुसार मालाचे व्यापारी राजेश ताराचंद अग्रवाल यांच्या घरासमोर लावलेली गाडी क्रमांक एमएच १८-एजे ३८ च्या काचा फोडल्या होत्या़ त्याचवेळी चंद्रशेखर बाऊस्कर यांची करवंद नाक्याजवळील हॉटेल मल्हार रेजेन्सीसमोर लावलेली गाडी क्रमांक एमएच १९-बीजी ५०५०, हॉटेल साहेबासमोरील सोनवणेनगरात विश्वास बडगुजर यांची एमएच ०३-बी ५११७, याच घरासमोर राहणारे दिगंबर दौलत माळी यांच्या अंगणात उभी असलेली गाडी क्रमांक एमएच १८-डब्ल्यू ७१५९ हिच्यादेखील काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली होती़ गेल्या आठवड्यात एकाच वेळी माथेफिरूंनी चार वाहनांच्या काचा फोडून मोठे नुकसान केल्याची घटना घडली होती़काल झालेल्या घटनेत एका दुचाकी गाडीवर ट्रिपल सीट आलेल्या माथेफिरूंनी ५ वाहनांच्या काचा फोडल्यात तर गतआठवड्यात दोन दुचाकी गाडीवर असलेल्या चार जणांनी या वाहनांचे नुकसान      केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे़ पोलिसांनी कारवाई करण्याची मागणीगेल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येथील आऱसी़पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ़डी़आऱपाटील यांच्या घरासमोर लावलेली कार अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना ताजी असताना पुन्हा या घटना घडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे़ पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून रात्री दहा वाजेनंतर ग्रुपने फिरणाºया युवकांवर तसेच निमझरी व करवंद नाका परिसरात रात्री उशिरापर्यंत टवाळखोर मुले धुमाकूळ घालत असून अशांवरदेखील कारवाई करण्याची मागणी केली जात आहे़ करवंद नाक्याजवळ पोलिस चौकी होऊन तेथे कायमस्वरूपी पोलीस पथक नियुक्त करावे़ जेणेकरून काही घटना घडल्यास तेथील पोलीस पथक लगेच नाकाबंदी करू शकतात़ हा परिसर रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो़, त्यामुळे परिसरात टवाळखोरांची वर्दळ असते़